नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. रामटेकमध्ये सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. युतीचे उमेदवार कृपाल तुमाणे यांनी मतदान केले. ५ वर्षातून एकदा येणारे हे लोकशाहीचे पर्व आहे. उन्हाची पर्वा न करता मतदान करून जनतेने आपले कर्तव्य बजावावे असे आव्हान तुमाणे यांनी केले.
LIVE -
- संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५१.७२ टक्के मतदान
- दुपारी ३ वाजेपर्यंत ४४. ५० टक्के मतदान
- दुपारी २ वाजेपर्यंत ३२.१६ टक्के मतदान
- दुपारी १ वाजेपर्यंत २३.१९ टक्के मतदान
- सकाळी ११ पर्यंत ९.८२ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
- सकाळी ९ वाजेपर्यंत ४.९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
- युतीचे उमेदवार कृपाल तुमानेंनी बजावला मतदानाचा हक्क
- ७:२० - मतदान केंद्राबाहेर मतदारांची तुरळक गर्दी झाली आहे.
- ७:०० - मतदानाला सुरुवात झाली आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूकही पहिल्या टप्प्यात होत आहे. या मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. रामटेक या मतदारसंघात - १९ लाख २१ हजार मतदार असून यासाठी आज एकूण २हजार ३६४ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे.