नागपूर : Eknath Shinde Goes To RSS HQ : हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आमदारांसाठी बुधवारी बैद्धिक शिबीर ठेवलं होतं. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले नव्हते. त्यामुळं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशीमबागेत भेट दिली. "हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये असताना रेशीमबागमध्ये भेट देऊन हेडगेवार यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेत असतो. परिसर चांगला आहे, इथं शांती मिळते. इथं येण्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यात काही राजकरण आहे असं तुम्हाला वाटत का? आमचं हिंदुत्व विकासाचा आहे. 'सबको साथ लेकर चलना' असं पंतप्रधान देखील सांगतात. सामान्य माणसाचं सरकार आहे, सामान्य माणूस कधी पण मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. मी सामान्य माणूस म्हणून काम करतो म्हणून लोक मला प्रेम करतात" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ : "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना मविआनं बंद केल्या होत्या. त्या आम्ही पुन्हा सुरू केल्या. हे पुरोगामी महाराष्ट्र आहे. अन्य राज्याच्या पेक्षा महाराष्ट्र वेगळा असून सगळे जातीपातीचे लोक एकत्र राहतात. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही आमची भूमिका. जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. लोकांच्या सेवेची प्रेरणा घेऊन येथून जाणार, आम्हाला काय मिळालं, या पेक्षा आम्ही देशाला काय देणार हा विचार हेडगेवार यांनी दिला आहे".
प्रत्येकानं आनंदाने जगलं पाहिजे : जातनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, या राज्याची संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. येथे सर्व जातीधर्माचे लोक राहतात, काम करतात आणि सण साजरे करतात. प्रत्येकानं आनंदानं जगलं पाहिजे, त्यामुळे राज्यातील जातीय सलोखा आणि कायदेशीर व्यवस्था बिघडू नये, यासाठी आमचा प्रयत्न आहे".
हेही वाचा :