नागपूर - आपल्या देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या तीनही दलातील सैनिकांना जल, जमीन,जंगल, डोंगरात आणि आकाशात कोणत्या विपरीत परिस्थितीत सेवा द्यावी लागते. डोळ्यात तेल घालून आपले जवान भूक तहान विसरून देशाची सेवा करतात आणि वेळप्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देखील देतात. ज्यावेळी हे जवान अश्या विषम परिस्थितीत राहतात तेव्हा त्यांना पोटभर अन्न ( Ready to eat tasty food ) देखील मिळतं असेल का, त्यांना स्वतःच्या आवडीचे पदार्थ खाता येत असतील का या विचाराने त्या जवानाच्या कुटुंबातील सदस्यांच्या मनाची घालमेल होते. सैनिकांचे आरोग्य जपत त्यांना पौष्टिक आणि आवडीचे अन्न मिळावे याकरिता डिफेन्स क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान बनवण्यासाठी प्रसिद्ध डीआरडीओच्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी ( Defense Food Research Laboratory ) मैसूरने झटपट तयार होणार रेडी टू इट चविष्ट ( Ready to eat tasty food ) पदार्थ तयार केले आहेत. एवढंच नाही तर अंतराळवीरांसाठी रेडी टू बिर्याणी ( Ready to biryani ) देखील तयार करण्यात आली आहे.
सैनिकांसाठी अत्यंत उपयोगी - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 108 वे भारतीय काँग्रेस सायन्समध्ये सुरू आहे. याठिकाणी डीआरडीओकडून विविध उपकरणांची माहिती देण्यासाठी प्रदर्शनी लावण्यात आली आहे. त्यात सैनिकांसाठी अत्यंत उपयोगी असलेली रेडी टू इट पदार्थ देखील ठेवण्यात आले आहेत. वजनाला अत्यंत कमी असल्याने ते एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी उपयुक्त आहेत.
दोन मिनिटांमध्ये पदार्थ तयार - सैन्यातील जवानांना अनेक दिवस दुर्गम भागात काढावे लागतात. तर सीमेवर तैनात आलेले जवान वर्षेभर सुद्धा घरी परत येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना घरच्या जेवणाची आठवण येत असते. जवानांची हीच समस्या लक्षात घेता डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीकडून रेडी टू इट पदार्थांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सुजी हलवा ते चिकन बिर्याणी पर्यंतचे पदार्थ अवघ्या दोन मिनिटात तयार होतील अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे जवानांची जे खाण्याची इच्छा होईल ती ईच्छा त्यांची आता पूर्ण होणार आहे.
अंतराळात सुद्धा मिळेल चिकन बिर्याणी - डीआरडीओच्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीने केवळ भारतीय सैनिकांसाठीच तर अंतराळवीरांचा विचार करून स्पेशल फूड तयार केले आहे. अंतरात पाण्याचा उपयोग करताना अनेकदा अडचणी येतात याकरिता स्पेस मध्ये खाण्याकरिता चिकन बिर्याणी सह अनेक प्रकारचे पदार्थ रेडी टू इट फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आले आहेत.
नौदलासाठी फारच उपयुक्त - भारतीय नौदलाच्या युद्ध नौका,पानडुब्बी या अनेक दिवस,महिने सुमुद्राच्या आत असतात. युध्द समयीतर परिस्थिती आणखीचं बिकट असले अश्या परिस्थितीत डीआरडीओच्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीकडून तयार करण्यात आलेले रेडी टू इट पॅकेट्स फारच उपयोगी सिद्ध होऊ शकतात.