नागपूर - यंदा कोरोनाच्या निर्बंध शिथिल झाल्यानंतर धुळवडीच्या सणासोबत नवीन नवीन रंग आयुष्यात भरले जाणार आहे. कोरोनातील बेरंग झालेले रंग विसरून जाऊन होळीच्या रंगीत रंगासोबत आनंद साजरा करण्याचा हा क्षण आहे. पण सण साजरा करतांना आरोग्याची काळजी घेण्याची तेवढीच गरज आहे. होळी साजरी करतांना काही खास नियमांचे पालन केले तर होळीचा आंनद लुटत आणि धमाल करता येईल. चला जाणून घेऊ नागपूरच्या प्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉ. ईशा अग्रवाल यांच्याकडून ईटीव्हीच्या या विशेष रिपोर्ट मधून.
रासायनिक भेसळयुक्त रंग विकले जात आहेत
होळी म्हटले की डोळ्यासमोर येतात निर निराळे रंग. यासोबतच रंगानी माखलेले रंबिरंगी चेहरे. पूर्वी बाजारात मिळणारे रंग हे शरीराला इजा करणारे नव्हते. पण आजकाल बाजारात मोठ्या प्रमाणात रासायनिक भेसळयुक्त रंग विकले जाता आहेत. हे रंग अधिक गधड बनवण्यासाठी त्यामध्ये केमिकलच्या वाढत्या वापारामुळे हे रंग धोकादायक बनले आहेत.
फुलांच्या रंगापासून पावडर करून वापरले जाऊ शकतात
या रंगांमध्ये असणारे बारीक कण हे चेहाराच्या, राशिराचे सूक्ष्म त्वचेच्या छिद्रात (स्किन पोअर्स) जाऊन त्वचेला नुकसान करतात. बरेचदा रंग तयार करताना यात शिसे अलकाईन, सल्फेट या सारखे शरीराला घातक ठरणाऱ्या साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे रंगा ऐवजी इको फ्रेंडली गुलालाच वापर फायद्याचा ठरू शकतो. किंवा फुलांच्या रंगापासून पावडर करून वापरले जाऊ शकतात.
रंगापासून त्रास टाळण्यासाठी घरगुती उपाय
काहींची त्वचा ही सेन्सेटिव्ह असते. त्यावेळी पक्क्या रंगानी त्वचेला खाज येणे, पुरळ येतात. त्यामूळेच रंगानी त्वचेला ईजा होऊ नये म्हणून बचावासाठी किंवा शरीराला त्रास होऊ नये म्हणून शुद्ध खोबरा तेल वापरण्याचा सल्ला त्वचा रोग तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यामुळे त्वचेला इजा कमी होतेच शिवाय लागलेला रंग सुटायला फायद्याचे ठरते. कोल्ड क्रीम किंवा व्यासलीनचा उपयोग करू शकत असल्याचे डॉ. ईशा अग्रवाल सांगतात.
शरीरावरील रंग कसा काढावा
एकदा होळी खेळण्याचे ठरले तरी गुलालाने हा सहज निघून जातो. पण पक्क्या रंगासोबत होळी खेळल्यास हे रंग शरीरावर पक्के लागता. यासाठी एकाच दिवसात रंग निघून जाईल अशी अपेक्षा करू नका. यासाठी खूप अंग घासल्याने सुद्धा शरीराला इजा होते. त्यानंतर लालसर पुरळ येतात. त्यामुळे रंग असल्यास त्वचेवरील पाणी रंग ओढून घेतल्याने त्वचा कोरडी पडते.
अंघोळ करण्यापूर्वी अंग पाण्याने ओले करा
नॅचरल कलिंजिंगचा वापर करावा. यात दुधाचा साईचा सुद्धा उपयोग केला जातो. यापासून रंग सुटण्यास मदत होते. अंघोळ करण्यापूर्वी अंग पाण्याने ओले केल्याने रंग निघण्यास मदत होऊ शकेल. तसेच, अंघोळीनंतरसुद्धा खोबरा तेल लावल्याने त्वचा कोरडी न राहता रंग सुटण्यास मदत होते. यापद्धतीचे छोटे छोटे उपाय करून सुद्धा होळीचा आनंद लुटला जाऊ शकत असल्याचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. ईशा अग्रवाल सांगतात.
चेहऱ्याला रंग लावत असताना डोळे बंद ठेवा
बरेचदा रंग खेळतांना रंग डोळ्यात जाऊन अधिक गंभीर त्रास होणारे प्रकार घडतात. त्यामुळे डोळ्यात रंग गेल्यास डोळे न चोळता स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. शक्यतो चेहऱ्याला रंग लावत असताना डोळे बंद ठेवा आणि त्यानंतरसुद्धा काळजीपूर्वक हळूहळू उघडा असे सांगितले जाते.
हेही वाचा - Devendra Fadnavis Pendrive bomb : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची तेजस मोरे विरोधात तक्रार