नागपूर - कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता राज्यात संचारबंदी लागू करून राज्यातील जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. तर आज संचारबंदीला चांगला प्रतिसाद दिसून येत असून केवळ गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे.
संचारबंदी 100 टक्के यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी साथ द्यावी. सकाळच्या सत्रात अत्यावश्यक सेवेशी जुळलेले लोकच बाहेर निघत आहेत. तर काही प्रमाणात काही काम नसतानाही लोक बाहेर पडत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अनेकांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. ज्यांना अत्यावश्यक कामे आहेत, त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यातून पासेस घ्यावेत, असेही आवाहनही नागपूर पोलिसांनी केले आहे.