नागपूर - सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवाचा पहिल्या दिवशी सकाळीच मंत्रोपचार आणि विधीवत पूजा करून नागपूरच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भाविक-भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
रेशीमबाग येथील प्रसिद्ध गणेश मंडळाला नागपूरचा राजा म्हणून ओळखले जाते. यंदा या राजाचे २४ वे वर्ष आहे. त्यामुळे गणेश मंडळाने बाप्पाच्या आगमनासाठी मोठी तयारी केली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वीच बाप्पाची मूर्ती मंडळात आणली होती. आज विधीवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणांना परिसर दणाणून गेला होता.