ETV Bharat / state

Devendra Fadnavis : एल्विश यादव प्रकरणावरुन संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

Devendra Fadnavis Reply Sanjay Raut : एल्विश यादव ड्रग प्रकरणी (Elvish Yadav Drug Case) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांचं उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी द्यावं, अशी मागणी राऊतांनी केली होती. यावर आता फडणवीस यांनी राऊतांना उत्तर दिलंय.

Devendra Fadnavis On Sanjay Raut
Devendra Fadnavis On Sanjay Raut
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 6:10 PM IST

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

नागपूर Devendra Fadnavis Reply Sanjay Raut : एल्विश यादव ड्रग प्रकरणावरून (Elvish Yadav Drug Case) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. ड्रग माफियांची सूत्रं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून चालतात का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना उत्तर दिलंय.

काय म्हणाले संजय राऊत? : गणपती कालावधीमध्ये युट्यूबर एल्विश यादव हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आरतीसाठी उपस्थित होता. त्यानं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीची आरती देखील केली. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत. या प्रकरणावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचं उत्तर राज्याचे गृहमंत्री यांना द्यावं लागेल. रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषापासून तयार होणारे अमली पदार्थ सेवन करणारे मुख्यमंत्र्यांच्या घरी येतात. पण, मुख्यमंत्र्यांना त्यांचं नाव माहिती नाही का? असा सवाल राऊतांनी केलाय.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री? : एल्विश यादवबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणेशोत्सव असतो, तेव्हा सेलिब्रिटी तिथे जातात. त्यावेळी एल्विश हा सेलिब्रिटी होता. तेव्हा एल्विशवर कोणतेही आरोप नव्हते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव या प्रकरणात ओढणं चुकीचं आहे. जर कोणी चूक केली असेल, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. विनाकारण कोणाचंही नाव ड्रग प्रकरणाशी जोडू नये.

ललित पाटीलवर मकोका कायद्यान्वये कारवाई : ड्रग माफिया ललित पाटीलवर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थ विक्रेत्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. राज्य सरकारनं 'नशामुक्त महाराष्ट्र अभियान' सुरू केलं आहे. ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत, असंही देवेद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, तसंच यात गुंतलेल्या पोलिसांना बडतर्फही केलं जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

काय आहे एल्विशवर आरोप : प्रसिद्ध यूट्यूबर तसंच 'बिग बॉस' फेम एल्विश यादव वादात सापडलाय. त्याच्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये अवैध सापाचं विष पुरवल्याचा आरोप आहे. या सापांच्या विषाचा वापर रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी केला जात होता. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच एल्विशवर नोयडामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

काय आहे संपूर्ण प्रकरण? : नोएडा पोलीस आणि वनविभागानं 2 नोव्हेंबर रोजी 9 सापांसह 5 जणांना अटक केली होती. यात 9 सापांपैकी 5 साप कोब्रा जातीचे होते. या सापाचं विष अत्यंत विषारी असतं. त्यामुळं सापाच्या विषाची जगभरात तस्करी करणारे तस्कर आढळून येत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 20 मिली सापाचं विषही सापडलं आहे. दिल्ली-एनसीआरमधील रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाचं विष वापरल्याचा आरोप आरोपींवर आहे. या प्रकरणात युट्यूबर एल्विश यादववरही आरोप असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. CM Eknath Shinde : जरांगेंनी उपोषण थांबवताच मुख्यमंत्र्यांनी टाकला सुस्कारा; दोन दिवसांसाठी दरे गावी दाखल
  2. Sanjay Raut On Eknath Shinde : 'ड्रग्ज प्रकरणाची सूत्रं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?' राऊतांचा खोचक सवाल
  3. Bus Fare Hike : ऐन दिवाळीत प्रवाशांचं निघालं दिवाळं; खासगी बसची तिप्पट भाडे वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.