ETV Bharat / state

वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता नागपूरमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली - नागपूर कोरोना ऑक्सिजन मागणी परिस्थिती

नागपुरातील शासकीय रुग्णालयात असलेल्या मेयो आणि मेडिकलकडे ऑक्सिजनचे स्वतःचे प्लाँट आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरून ऑक्सिजन घेण्याची गरज नसते. मात्र, वाढती रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजनची मागणी

nagpur corona situation
नागपूर ऑक्सिजन परिस्थिती
author img

By

Published : Sep 20, 2020, 10:36 PM IST

नागपूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढलेली आहे. सध्या दर दिवसाला 7 हजार सिलिंडरची मागणी होत आहे. नागपुरात सध्या 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जात आहे. शिवाय 97 मॅट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादनही नागपुरच्या औद्योगिक क्षेत्रात घेतले जाते. तसेच रोज उत्पादित होत असलेल्या ऑक्सिजनपैकी 80 टक्के ऑक्सिजन आरोग्य क्षेत्रासाठी आरक्षित करण्यात आला आहे. तर 20 टक्के ऑक्सिजनसाठा उद्योग क्षेत्रासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.

सध्या नागपुरमध्ये 50 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. तरी उर्वरित ऑक्सिजन 20 टन ऑक्सिजन नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना पुरवले जाते. इतकेच नाही तर नागपुर विभागाबाहेरील अमरावती, यवतमाळ, अकोला आणि नांदेड जिल्ह्यांनाही नागपुरातूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

नागपूरात ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या दोन मोठ्या कंपनी आहेत. त्यांच्याकडे ऑक्सिजन पुरवठा करण्याची स्वतःची यंत्रणा आहे. दोन्ही कंपनी मिळून 14 टँकर उपलब्ध आहेत. याच टँकरच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. तसेच एक टँकर रोज छत्तीसगड येथील भिलाई येथूनसुद्धा ऑक्सिजन घेऊन येतो.

नागपुरातील शासकीय रुग्णालयात असलेल्या मेयो आणि मेडिकलकडे ऑक्सिजनचे स्वतःचे प्लाँट आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरून ऑक्सिजन घेण्याची गरज नसते.

  • नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती -

दरम्यान, आज (रविवारी) नागपूरमध्ये 1 हजार 226 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यात शहरातील 993 तर ग्रामीणमधील 228 रुग्णांचा समावेश आहे. याबरोबरच येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 63 हजार 757 इतकी झाली आहे. तर आज रविवारी 1 हजार 610 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील 1 हजार 362 तर ग्रामीण 248 जणांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण 51 हजार 556 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या स्थितीत 10 हजार 157 अक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज (रविवारी) 54 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 2 हजार 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची टक्केवारी 80.86 टक्के इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.