ETV Bharat / state

जम्मूत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण - nagpur breaking news

जम्मूतील बडगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागपूरच्या नरेश बडोले यांना वीरमरण आले आहे.

नरेश बडोले
नरेश बडोले
author img

By

Published : Sep 24, 2020, 3:43 PM IST

Updated : Sep 24, 2020, 8:15 PM IST

नागपूर - जम्मूतील बडगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागपूरच्या नरेश बडोले यांना वीरमरण आले आहे. नरेश बडोले हे केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहायक उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते. अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना गोळ्या लागल्या. मात्र, उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आल्याचे प्राथमिक माहिती आहे. वीर हुतात्मा हे गोदिंया जिल्ह्यातील बामणी या गावचे मूळ राहिवासी होते. गेल्या अनेक वर्षापासून ते नागपुरातील वैशाली नगरात स्थायिक झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार बडोले यांचे अत्यंसंस्कार होणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव आहे. 24 एप्रिल, 1971 रोजी जन्मलेले बडोले 1989 मध्ये सीआरपीएफच्या 117 बटालीयनमध्ये रुजू झाले होते. जम्मू बडगाव येथील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर आज (दि. 24 सप्टें.) सकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला. बडोले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव नागपूरला आणण्यात येणार आहे. मागील 15 वर्षांपासून बडोले हे नागपूर येथे पत्नी व दोन मुली सोबत रहात होते.

या घटनेमुळे हुतात्म्याच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. प्राप्त माहीतीनुसार उद्या (दि. 25 सप्टें.) सकाळी त्यांच्यावर नागपुरातील हिंगणा भागातील डिगडोह स्मशानभूमीत अत्यंसंस्कार होणार आहे. आज (दि. 24 सप्टें.) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन, एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.

हेही वाचा - नागपुरात आता ५३वे नवे कोविड रुग्णालय; नागरिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेकडून व्यवस्था

Last Updated : Sep 24, 2020, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.