ETV Bharat / state

पोलीस व्हॅनमध्ये कुख्यात गुंडाने बनवला टिक-टॉक व्हिडिओ, पोलीस दलात खळबळ

नागपूरमधील कुख्यात गुंडाने पोलीस व्हॅनमध्ये टिक-टॉक व्हिडिओ बनवला. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आरोपी सय्यद मोबिन अहमद
author img

By

Published : May 10, 2019, 10:28 AM IST

Updated : May 10, 2019, 10:53 AM IST

नागपूर - शहरातील कुख्यात गुंड सय्यद मोबिन अहमद याने पोलिसांच्या गाडीत बसून टिक-टॉक व्हिडिओ तयार केला आहे. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावरदेखील शेअर केला. त्यामुळे सध्या नागपुरात या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मात्र, खळबळ उडाली आहे.

आरोपी सय्यद मोबिन अहमद

आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बघता त्याच्यावर दोन महिन्यांपूर्वी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याने पोलीस ठाण्याच्या बाहेरील पोलीस गाडीत टिक-टॉक व्हिडिओ तयार केला. नागपुरातील गुंडाची पोलिसांसोबत असलेली दोस्ती नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. एरवी ही दोस्ती गुपचूप पद्धतीने निभावली जायची. मात्र, आता थेट या दोस्तीचे लाभार्थी असलेले गुंड पोलिसांच्या गाडीचा उपयोग करून दहशत माजवू बघत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीवर शासकीय वाहनाचा गैरप्रकार केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या व्हिडिओत गुंड सैयदला मोबाईल कसा वापरता आला? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्याला पोलिसांनी गाडी कुणाच्या परवानगीने वापरायला दिली. या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना द्यावी लागणार आहे. मात्र, पोलीस विभागाने सध्या या प्रकरणावर हाताची घडी तोंडावर बोट, अशी भूमिका घेतली आहे.

Intro:पोलिसांचे भय नसलेल्या नागपुरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि असामाजिकतत्व कधी काय करतील याचा नेम उरलेला नाही...नागपूरात एका कुख्यात गुंडाने चक्क पोलीस व्हॅनमध्ये टीक टाॅक व्हीडीओ बनवला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय...आरोपीनेच पोलीस व्हॅनमध्ये गुंडाचा टीक टाॅक व्हीडीओ तयार करून तो व्हायरल केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे...कुख्यात गुंड सैयद मोबीन अहमद याने हा व्हीडीओ व्हायरल केलायBody:नागपूर शहरातील गुंडाचे मनोबल किती उंचावले आहे हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या टिक-टॉक वर व्हायरल होतो आहे...शहरातील नामचीन गुंड सय्यद मोबिन अहमद याने पोलीसांच्या गाडीत बसून टिक-टॉक व्हिडीओ तयार केला,तो एवढ्यावरच न थांबता त्याने चक्क तो व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल देखील केला,त्यामुळे सध्या नागपुरात या व्हिडियोची जितकी चर्चा सुरू आहे,त्या पेक्षाची जास्त कसबुस ही पोलिसांच्या नाकर्तेपणाची होत आहे..आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बघता त्याच्यावर दोन महिन्यांपूर्वी तडीपारची कारवाई करण्यात आली होती,तरी देखील त्याने कोरडी पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या पोलीस गाडीत टिक-टॉक व्हिडीओ तयार केला..पोलिसांनी न गावसणारे हे आरोपी थेट पोलिसांना आवाहन देताना दिसत आहेत...
नागपुरातील गुंडाची पोलिसांसोबत असलेली दोस्ती नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे...एरवी ही दोस्ती गुपचूप पद्धतीने निभावली जायची मात्र आता थेट या दोस्तीचे लाभार्थी असलेले गुंग पोलिसांच्या गाडीचा उपयोग करून दहशत माजावू बघत आहेत...व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी सैयद मोबीन अहमद शासकीय वाहनाचा गैरप्रकार केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी केला सैयदवर गुन्हा दाखल केला आहे...या व्हीडीओत कुख्यात गुंड सैयद याला मोबाईल कसा वापरता आला हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्याला पोलिसांनी गाडी कुणाच्या परवानगीने वापरायला देण्यात आली या देखील गंभीर प्रश्नांची उत्तरे पोलिसांना द्यावी लागणार आहे...पोलीस विभागाने सध्या या प्रकरणावर हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतली आहे...
Conclusion:
Last Updated : May 10, 2019, 10:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.