ETV Bharat / state

'काय भौ...खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकतो अन् कोरोना पसरवतो' - नागपूर कोरोना अपडेट

नागपुरात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, रस्त्यावर थुंकणारे लोक देखील याला जबाबदार आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यात तंबाखूनजन्य पदार्थ म्हणजे पान, खर्रा, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या थुंकीमुळे इतरांना संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे नागपुरात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे डॉ. बानाईत यांनी सांगितले.

corona infection through spitting  corona update in nagpur  corona positive cases in nagpur  थुंकीमधून कोरोनाचा संसर्ग  नागपूर कोरोना अपडेट  नागपूर कोरोना पॉझिटिव्ह केसेस
'काय भौ...खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकतो अन् कोरोना पसरवतो'
author img

By

Published : Jul 22, 2020, 12:54 PM IST

नागपूर - शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणारे त्याला जबाबदार असल्याचे सांगितले जातेय. थुंकीतून अधिक लोकांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. इतकेच नाहीतर यामुळे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणारेच व्यक्ती बळी पडतात, असे मत डॉ. अविनाश बानाईत यांनी व्यक्त केले आहे.

तंबाखूजन्य पदार्थ खाऊन जागोजागी थुंकल्यामुळे कशाप्रकारे कोरोना पसरतो याबाबत माहिती देताना डॉ. बानाईत

नागपुरात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, रस्त्यावर थुंकणारे लोक देखील याला जबाबदार आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यात तंबाखूनजन्य पदार्थ म्हणजे पान, खर्रा, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या थुंकीमुळे इतरांना संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे नागपुरात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे डॉ. बानाईत यांनी सांगितले. थुंकी आणि त्यामधील लाळेतून संसर्गाचा धोका अधिक असल्याचेही ते म्हणाले. शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे एकापेक्षा अधिक लोकांना त्याचा धोका असतो, असेही ते म्हणाले. थुंकीतून बाहेर पडणारे विषाणू हे अधिक तास जीवंत राहतात. अशावेळी ती थुंकीचा एखाद्या व्यक्तीच्या हाताला स्पर्श झाल्यास त्याचा थेट परिणाम होतो, असेही डॉ. बानाईत म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महारापालिकेकडून कारवाई सुरू आहे. परंतु, असे असले तरी परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी किती काळ लागेल? याबाबत सांगता येणार नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी थुंकीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. बानाईत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.