ETV Bharat / state

नागपूरात बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्षात संपर्क करा- जिल्हाधिकारी

author img

By

Published : Apr 8, 2021, 7:00 PM IST

नागपूरात कोरोना रुग्णांचे आकडे धास्ती भरवणारे आहेत. अश्या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांना बेडस मिळत नसल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असताना ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल सुरू आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

नागपूर - नागपूरात कोरोना रुग्णांचे आकडे धास्ती भरवणारे आहेत. अश्या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांना बेडस मिळत नसल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असताना ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल सुरू आहे. नागपूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. तेथील नागरीकांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड,आयसीयु बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर) निर्मीती करण्यात आली आहे. हे कॉल सेंटर २४ तास सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले आहेत. नागपूरमध्ये ऑक्सीजनचा साठा मुबलक प्रमाणात असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

समन्वय कक्षातील संपर्क क्रमांक 0712-2562668 असून 1077 या टोल फ्री क्रमांकावर नागरीकांनी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज केले. समन्वय कक्षातील या क्रमांकावर नागरीकांना चोवीस तास संपर्क करता येऊ शकेल असे ते म्हणाले.

६ मिनिटाची स्वतः करा चाचणी

ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी लक्षणे जाणवताच वेळ न दवडता उपचार सुरू करावे. गावात आशा व अंगणवाडी सेविकेमार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. कोरोनासाठी वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सल्यानुसार ६ मिनीट चालण्याची जलद चाचणी करता येईल. त्यात चालण्यापूर्वी केलेली एखादया व्यक्तीची ऑक्सिजन (प्राणवायू ) पातळी व चालल्यानंतरची प्राणवायू पातळी यात जर 4 पेक्षा जास्त फरक असेल तर ते गंभीर आहे. ताप, सर्दी, खोकला, असल्यास वेळकाढूपणा न करता लवकर वैद्यकीय उपचार सुरू करण्याचे गरजेचे आहे. आरोग्याची स्थिती ढासळण्यापुर्वी नागरीकांनी नागपूर येथील शासकीय किंवा खासगी रूग्णालयात धाव घ्यावी. त्यासाठीच समन्वय कक्षाची स्थापना केली आहे.

ऑक्सिजनसाठा मुबलक उपलब्ध-

जिल्ह्यात ऑक्सिजन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुटवडयाची कोणतीही तक्रार नाही. जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादकांखेरीज भिलाई स्टिल प्लॉन्टवरून देखील पुरवठा होत असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. रेमडेसिवीर औषधाच्या साठ्याची माहिती घेण्यात येत असून मेडिकल स्टोअर्स मधून रेमडेसिवीर वर विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता पुरवठादार थेट हॉस्पिटलला व हॉस्पिटल संबंधित मेडिकल स्टोअर्सलाच पुरवठा करणार आहे. खासगी रूग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची तपासणी, अन्न व औषध प्रशासन विभागातील चमूमार्फत करण्यात येणार आहे. तसेच चाचण्याच्या संख्येचे अपलोडींग व देयक तफावतीतील अपप्रकारांची देखील शहानिशा करत असल्याचे त्यांनी सांगीतले.

हेही वाचा- सीबीआय चौकशी सुरूच राहणार, अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.