ETV Bharat / state

Nagpur Teacher Constituency Election : नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे संभ्रम, विदर्भ शिक्षक मतदारसंघात उमेदवारीचा घोळ कायम - विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तरी देखील निवडणुकीत कुणाची कुणाशी थेट लढत होईल याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट होत नाही. त्यात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्त्यामुळे संभ्रम वाढला आहे. काँग्रेस कुणाला समर्थन देणार हे अजून ठरले नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

Nagpur Teacher Constituency Election
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे संभ्रम
author img

By

Published : Jan 12, 2023, 2:58 PM IST

Updated : Jan 12, 2023, 3:22 PM IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे संभ्रम

नागपूर : नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की शिक्षक भारती, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, ठाकरे गट या सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, मात्र असूनही काँग्रेसचा घोळ सुरूच असल्याचे चित्र आहे.

भाजपकडून नागो गाणार यांना पाठिंबा : भाजपकडून विद्यमान आमदार नागो गाणार यांना समर्थन देण्यात आले आहे. भाजपमध्ये अनेकजन उमेदवारी मिळावी यासाठी उत्सुक होते. मात्र,नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक शिक्षक परिषद लढवीतात. त्यामुळे भाजपने नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या दोन निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना समर्थन दिल्यामुळे ते दोनदा शिक्षक आमदार म्हणून निवडून आले होते.

आपचा उमेदवार ही रिंगणात : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या मदतीने शिक्षक परिषदेने जिंकली आहे. याआधीच्या सलग दोन निवडणुकीत नागो गाणार निवडून आले आहेत. मात्र, यावेळी आम आदमी पक्षाने देवेंद्र वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. देवेंद्र वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने यावेळची निवडणूक तिरंगी होणार हे जवळजवळ आता स्पष्ट झालेले आहे.

पाचपैकी दोन जागा विदर्भातील : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 2 जागा या विदर्भातील आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम केला जाहीर : इतर निवडणुकांच्या तुलनेत शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक वेगळी असते. लोकसभा, विधानसभा मतदार संघांच्या होणाऱ्या निवडणुका आपल्याला माहित असतात. मात्र विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात.

३० जानेवारीला मतदान : निवडणुकीची अधिसूचना 5 जानेवारीला जारी झाली आहे. 12 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार, 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार, तर 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विश्वनाथ डायगव्हाणे यांनी 8 महिन्यांपूर्वीच या निवडणुकीसाठी चंद्रपूरचे सुधाकर अडबाले यांची उमेदवारी जारी केली. शिक्षक भारतीचे कपिल भारती यांनी राजेंद्र झाडे यांची महिनाभरापूर्वी घोषणा केली. या निवडणुकीच्या निमित्ताने झाडे हे तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. भाजपच्या उमेदवारीसाठी तीन प्रबळ दावेदार होते. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस निवडून येणाऱ्या उमेद्वाराच्या पाठीशी राहू शकते.

Last Updated : Jan 12, 2023, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.