नागपूर : Congress On Manoj Jarange Patil : भाजपाने लावलेली जाती-जातीतील ही आग आहे. याचाच हा परिणाम आहे. प्रत्येकाला आपलं आरक्षण जाणार तर नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नागपुरात सभा झाल्यास आम्ही तयार: इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ही भोपाळमध्ये होणार होती. मात्र, आता मध्यप्रदेशात निवडणुका आहेत. तसेच आता सभा महाराष्ट्रात होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. सभा व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना पत्र दिले आहे. इंडिया आघाडीत देशातील जे घटक आहेत, त्या सगळ्यांच्या तारखा जुळणेही महत्त्वाचे असतात. सभा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तयार असल्याचं नाना पटोले म्हणाले.
नरेंद्र मोदी सर्व गुजरातला घेऊन जातात : पंंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. मात्र, महाराष्ट्राला ते काय देतील हे त्यांनी सांगावं. कारण मोदी जेव्हा येतात ते सगळं गुजरातला घेऊन जातात, असे नाना पटोले म्हणाले.
वेणूगोपाल आणि माझी भेट झालेली नाही : के. सी. वेणूगोपाल यांची आणि माझी भेट झालेली नाही. ज्या बातम्या येत आहेत त्यात तथ्य नाही. मी चंद्रपूर आणि बल्लारपूर येथे होतो. चुकीच्या बातम्या कोण प्रसारित करत आहे हे मला माहित नसल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. 'इंडिया' आघाडीची पहिली सभा नागपुरात होण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. तशी विचारणा झाली असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...: मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. सरकारने निर्णय घ्यायचा आहे. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. दिलेल्या मुदतीतील दहा दिवस शिल्लक आहेत. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता आरक्षण द्यावं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचे आजच्या सभेतून स्पष्ट झालं आहे. त्यांचा रोख मराठा नेत्यांवर स्पष्टपणे दिसत आहे, असे मत वडेट्टीवार यांनी मांडले.
माझ्या कार्यकाळात मी हे कामं केलं: महाज्योती संदर्भात निर्णय हा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता; पण अंमलबजावणी माझ्या काळात झाली. वसतिगृह संदर्भात निर्णय झाला. मात्र, दोन वर्षे कोरोना काळात शाळा व वसतिगृह बंद होती, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा:
- Manoj Jarange Rally : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची तोफ धडाडली ; म्हणाले ५० टक्केच्या आतलं आरक्षण द्या..!
- Maratha Reservation Row : मराठा आरक्षण; पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना समज द्यावी, नाहीतर. . . मनोज जरांगेंनी दिला इशारा
- Manoj Jarange On Devendra Fadnavis : 'जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले...', मनोज जरांगेंची सदावर्तेंसह देवेंद्र फडणवीसांवर टीका