नागपूर - एकीकडे उपराजधानी नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी म्यूकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचे थैमान अजूनही सुरूच आहे. ज्यामुळे एकट्या नागपुरात तब्बल ४३ रुग्णांना आपले डोळे गमावले आहेत, तर दुर्दैवाने २६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी फक्त अडीच महिन्यातील आहे. याच काळात तब्बल पाचशे पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यापैकी ४३ रुग्णांना आपले डोळे गमवावे लागले, मात्र वेळीस उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
कोरोनाकाळातील औषधांच्या वापरामुळे धोका
म्यूकमायकोसिस अर्थात 'ब्लँक फंगस'चे अनेक रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. ही संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह असलेल्यांना या आजाराचा धोका अधिक आहे. कोरोना वाढल्यास अँटीव्हायरल आणि स्टेरॉइड दिले जातात. काही रुग्णांमध्ये नंतर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे कोरोना काळातील औषधांच्या वापरामुळे रुग्णांना म्यूकरमायकोसिसचा धोका संभवतो आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारांची गरज असते. अन्यथा एक ते दोन आठवड्यांत ही बुरशी डोळे आणि मेंदूपर्यंत पोहचू शकते. डोळा, जबडा यासंदर्भात गंभीर परिणाम होऊ शकते. त्यामुळे कोविड होऊन गेलेल्या रुग्णांनी त्यांचे तोंड व डोळे यांची तपासणी नियमित करावी, असा सल्ला डॉक्टरांकडून अनेकवेळा देण्यात येत असला तरी नागरिकांमध्ये अज्ञानता दिसून येत आहे.
हेही वाचा-राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद; प्रत्येक रुग्णावर कोविड सेंटरमध्येच उपचार