ETV Bharat / state

... तर नुकसान महाराष्ट्राचेच, विचार करावा लागेल; गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रीय महामार्ग निर्माण कामात शिवसैनिक अडचणी आणत आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. तसेच, यावर मार्ग काढण्याची विनंती केली आहे. अन्यथा काम बंद पडले तर यात महाराष्ट्राचेच नुकसान असल्याचेही म्हटले आहे.

गडकरी
गडकरी
author img

By

Published : Aug 14, 2021, 5:55 PM IST

नागपूर - 'केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग (National High way) निर्माण कामात शिवसैनिक अडचणी आणत आहेत. विशेषकरून हा प्रकार वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने होत आहे. याकडे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लक्ष घालावे', असे पत्र (Letter) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari) मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 'कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. काम बंद पाडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत', असाही पत्रात उल्लेख आहे.

'...तर विचार करावा लागेल'

'यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) असे काम बंद पाडण्याची मजल लोकप्रतिनिधी करत असतील, तर यापुढे रस्ते मंजूर करताना विचार करावा लागले, असा विचार केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्रालय यावर गांभीऱ्याने विचार करत आहे. यामुळे मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालावे', अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

काय म्हटलंय पत्रात?

गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

1) अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, या बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले आहे.

२. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्णत्वास आले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना, अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले. मात्र, शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

पत्राद्वारे शिवसैनिकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

'...तर महाराष्ट्राचेच नुकसान होईल'

4) उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत का? आणि कशी? याबद्दल रस्ते वाहतूक मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.

5) हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. परिणामी महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.

'कृपया मार्ग काढावा'

ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.