ETV Bharat / state

शुक्रवारी मुख्यमंत्री पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर; मंत्री वडेट्टीवारांची माहिती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी एक दिवसाच्या पूर्व विदर्भ दौऱ्यावर

मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर ते राजीव टेकडी या पर्यटन स्थळालादेखील भेट देणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात आगमन होणार आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Jan 7, 2021, 7:56 PM IST

नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी एक दिवसाच्या पूर्व विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर विमानतळावर पोहचल्यावर हेलिकॉप्टरने ते थेट भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाची पाहणी करणार आहेत. गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी कालवा हा सिंदेवाही व मूलपर्यंत जाणार आहे. या कालव्याची मुख्यमंत्री ठाकरे पाहणी करणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

नागपूर

मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर ते राजीव टेकडी या पर्यटन स्थळालादेखील भेट देणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात आगमन होणार आहे. गोसेखुर्द धरणासंदर्भात आढावा घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या बाबतीत चर्चा व आवश्यक निधीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

उपराजधानी नागपुरात कोणताही कार्यक्रम नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवसाच्या दौऱ्यावर येत असताना उपराजधानी नागपुरात त्यांचा एकही कार्यक्रम किंवा बैठक नाही. २०१९ साली विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री नागपुरात आलेले नाहीत. मात्र, नागपूरमार्गे त्यांनी पश्चिम विदर्भाचा धावता दौरा केला आहे. कोरोनानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. गेल्या महिन्यात समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी ते अमरावतीत जिल्ह्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.