नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(शुक्रवार) दीक्षाभूमीला भेट देवून भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले. मुख्यमंत्री ठाकरे यांची दीक्षाभूमीला ही पहिलीच भेट आहे.
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक आणि परिसराची पाहणी केली. यावेळी काँग्रेस नेते व कॅबिनेट मंत्री डॉ. नितीन राऊत तसेच महाविकास आघाडीचे इतर नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - सरकारकडून शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणे चूक - प्रविण दरेकर
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द नाही - आशिष शेलार