ETV Bharat / state

Deputy CM Fadnavis Gadchiroli Visit: काल नक्षलवाद्यांशी चकमक, आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस थेट छत्तीसगडच्या सीमेवर

author img

By

Published : May 1, 2023, 10:41 PM IST

आज महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी काल तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्याच्या जवळच असलेल्या दामरंचा आणि थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. 'सी- 60' जवानांचा गणवेश परिधान करून एकप्रकारे मी तुमच्यापैकीच एक आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश दिला.

Deputy CM Fadnavis Gadchiroli Visit
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: आज दुपारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाले. प्रारंभी दामरंचा आणि नंतर ग्यारापत्ती या दोन्ही ठिकाणी त्यांनी पोलीस इमारतींचे उद्‌घाटन केले. दामरंचा हा गडचिरोलीचा अहेरी तालुक्यातील दक्षिणी भाग, तर ग्यारापत्ती उत्तर गडचिरोलीतील, थेट छत्तीसगडच्या सीमेवरील भाग आहे. काल 3 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, ते ठिकाण दामरंचा येथून 7-8 किलोमीटर अंतरावर आहे.

नागरिकांशी संवाद साधला: आपले जवान धोका पत्करुन काम करतात. त्यांचे मनोबल वाढविणे आणि नागरिकांशी संवाद साधणे, हाच भेटी मागचा दुहेरी उद्देश आहे. ग्यारापत्ती हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव. तेथूनच छत्तीसगड सुरू होते; पण पुढे 35 कि.मी.पर्यंत कोणतेही पोलीस ठाणे नाही. अतिसंवेदनशील भागात साधारणत: आमदारांच्या पलीकडे कुणी भेटत नाही, तेथे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन नागरिकांशी वैयक्तिक संवाद साधला.

कोणत्या योजना तुम्हाला माहीत आहेत? एसटीचा अर्ध्या तिकिटात प्रवास, शेतीच्या कोणकोणत्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात, असे प्रश्न त्यांनी महिला, पुरुषांना विचारले आणि शासकीय योजनांबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. काही महिलांनी सध्या केवळ सकाळी आणि सायंकाळीच बस येते, दुपारी बस सुरू करा, अशी मागणी केली. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी महिलांना अर्धे तिकिट आणि लेक लाडकी या योजनांचे स्वागतसुद्धा केले. आदिवासी बांधवांनी फडणवीसांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.

शहीद स्मारकाला अभिवादन: गडचिरोली येथे देवेंद्र फडणवीस यांनी शहीद स्मारकाला अभिवादन केले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील एकलव्य सभागृहात त्यांनी 'सी-60' च्या जवानांचा सत्कार केला. या नूतन सभागृहाचेसुद्धा उद्‌घाटन केले. दादालोरा खिडकी या नावाने एक योजना गडचिरोली पोलीस राबवित आहे. शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम गडचिरोली पोलीस करीत आहेत. या योजनेशी प्रशंसा करतानाच काही लाभांचे वितरण या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

नक्षलवाद ही देशविरोधी लढाई: नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय शक्ती आणि 'आयएसआय'सारख्यांची मदत नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणार्‍यांची ती लढाई आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो: नक्षल कारवायांमध्ये सामान्य माणसांचे, आदिवासी, अनुसूचित जातीच्या लोकांचे बळी गेले आहेत. लोकहिताची, व्यापक विकासाला कायम नक्षल विचारधारेने विरोध केला आहे. त्यामुळेच एकीकडे या समस्येविरोधात लढणार्‍या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी तर दुसरीकडे जनतेशी संवाद साधण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. गडचिरोलीत यापूर्वीही मी दोन वेळा मुक्काम केला आहे आणि आजही मुक्काम करणार आहे. कदाचित गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो, असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले.

हेही वाचा: Uddhav Thackeray in Vajramuth Sabha : मुंबई तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे करू; उद्धव ठाकरेंचा इशारा, 'बारसू'वर केले भाष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.