नागपूर - शहरातील बहुप्रतीक्षित अंबाझरी बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजेच जैवविविधता उद्यानाचे येत्या २८ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यानंतर हे उद्यान पर्यटकांसाठी सुरू होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित राहणार आहेत.
अंबाझरी उद्यान हे १८०० एकर मध्ये उभारण्यात आले आहे. या उद्यानात गवताच्या १५ प्रजाती आहेत. तसेच १०४ प्रजातीचे फुलपाखरू आहेत. त्यासोबतच ५२० प्रकारची वेगवेगळी झाडेदेखील आहेत, अशी माहिती राज्यमंत्री फुके यांनी दिली. तसेच १८०० एकरच्या या परिक्षेत्रामध्ये पर्यटकांसाठी २५ सायकल, २ रिक्षा आणि ११ सायकल दिल्या आहेत.