ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका, संदीप देशपांडे देणार सडेतोड उत्तर - राज ठाकरे ब्रेकिंग न्यूज

मनसे महासचिव संदीप देशपांडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सडेतोड उत्तर देणार आहेत. देशपांडे फेसबुक लाईव्हद्वारे बोलणार आहेत.

sandeep deshpande
संदीप देशपांडे
author img

By

Published : Apr 3, 2021, 11:03 AM IST

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि समोरील आव्हाने याबाबत माहिती दिली. तसेच लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या विरोधकांचाही समाचार घेतला. त्याबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही मास्क न लावण्यात शौर्य काय? मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का? असा खोचक टोला लगावला होता. या टिकेनंतर मनसे नेते खवळलेले आहेत. मनसेचे महासचिव संदीप देशपांडे आता मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर देणार आहेत. त्यासाठी आज सकाळी 11 वाजता देशपांडे फेसबुक लाईव्ह करणार आहेत. याची माहिती त्यांनीच ट्विट करून दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या भाषणात नाव न घेता राज यांना टोला लगावला होता. अनेक जणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय? मी मास्क वापरणार नाही. मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला होता. मास्क घालण्यात लाज कसली? मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. हे मनसे नेत्यांच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.

मनसेचा या आधीही लॉकडाऊनला विरोध

मनसेनेही लॉकडाऊनला या आधी विरोध केला होता. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचं नुकसान होणार आहे. ते सरकार भरून देणार आहे का? आम्हाला बारमधून तीन लाख रुपये हप्ता येत नाही, असा टोला मनसेचे महासचिव संदीप देशपांडे यांनी लगावला. साधी सर्दी झाली आणि टेस्ट केलं तरी कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट येतो. या सर्व गोष्टी लक्षात घ्या. लोक आता लॉकडाऊन मानायला तयार नाहीत. हा मुर्खपणा किंवा आततायीपणा केल्यास लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही संदीप देशपांडेंनी दिला.

देशपांडे काय बोलणार ?

मनसे नेते संदीप देशपांडे मुख्यमंत्र्यांना उत्तर देणार आहेत. त्यामुळे आता ते काय बोलतील? याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - आपल्या मंत्र्यांना निधी कमी मिळतो, काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी

हेही वाचा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा दावा खोटा, नागपुरातील कोरोना परिस्थिती भीषण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.