ETV Bharat / state

Chandrasekhar Bawankule On Uddhav Thackeray : शरद पवारांच्या रुग्णालयात जाऊन उद्धव ठाकरे बिघडले - बावनकुळे - Uddhav Thackeray Dussehra gathering speech

Chandrasekhar Bawankule On Uddhav Thackeray : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून निशाना साधलाय. उद्धव ठाकरे शरद पवार तसंच काँग्रेसचे वकील आहेत असं त्यांनी म्हटलंय. ते आज नागपुरात बोलत होते.

Chandrasekhar Bawankule On Uddhav Thackeray

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 7:06 PM IST

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

नागपूर Chandrasekhar Bawankule On Uddhav Thackeray : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर टीका केली आहे. ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांचं भाषण रटाळ होतं. उद्धव ठाकरेंनी काहीही म्हटलं, तरी ते शरद पवार, काँग्रेसचे वकील आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी केलाय. ते नागपुरातील निवासस्थानी बोलत होते.

उद्धव ठाकरे व्हिजनलेस व्यक्ती : उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला नाही. स्टालिन यांच्यासोबत जाऊ असं त्यांनी पुन्हा रेटून सांगितलं. महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंना लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही, विकासाचे मुद्दे मांडता येत नाहीत, उद्धव ठाकरे व्हिजनलेस व्यक्ती आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केलाय.

उध्दव ठाकरेंना काहीही आठवत नाही : उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत. त्यांना काही आठवत नाही. विकासाच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांना काहीचं कळत नाही. सत्तेत येण्यासाठी 2047 पर्यंत सर्वांनी वाट बघावी. ठाकरेंनी स्पष्ट बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं, असा आरोप बावनकुळे यांनी केलाय.

निलेश राणे उत्तम नेते : प्रत्येकाच्या जीवनात अशा घटना घडतात. जेंव्हा काहीशी निराशा येते, तेव्हा कार्यकर्ते नाराज होतात. मी स्वतः रत्नागिरीला जाऊन आलो. निलेश राणे चांगले नेते आहेत. समाजातील शेवटच्या माणसाच्या विकासाचा ध्यास निलेश राणे यांच्याकडं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करावं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी छत्रपती शिवरायांना साक्षी ठेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. मराठा समाजानं मुख्यमंत्री शिंदे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे जबाबदार नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं वचन देत आहेत. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी थोडी वाट पाहावी, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केलीय.

जरांगे यांनी विचार करावा : महाराष्ट्रातील सर्व पक्ष, नेते आरक्षणाच्या बाजूनं आहेत. एकमुखानं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूनं सरकार आहे. त्यामुळं गावबंदी करून काय फायदा,असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केलाय.

पंकजा आमच्या नेत्या : पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजपा आहे. त्यांच्या बोलण्यात काही वेगळं नाही. पक्ष योग्य निर्णय घेईल. केंद्रिय नेतृत्व पंकजा मुंडेंच्या मागे ठामपणे उभं असल्याचा दावा देखील बावनकुळे यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. Ravindra Chavan On Nilesh Rane : निलेश राणेंची रिटायरमेंट बारगळली? पुन्हा कोकणातील राजकारणात सक्रिय होणार - रविंद्र चव्हाण
  2. Ashish Shelar : ठाकरे विकासाच्या वाटेतील गतिरोधक, तुमची ग्रामपंचायतीत तरी सत्ता टिकेल का, आशिष शेलार यांचा टोला
  3. Maratha Reservation : मनोज जरांगेंना मराठा आरक्षणासाठी मिलतोय मोठा पाठिंबा, मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.