नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वभाव व मित्रत्व जपण्याची खास शैली अनेकांना ज्ञात आहे. हीच मित्रत्व जपण्याची गडकरी यांची शैली रविवारी (दि. 1 मार्च) पुन्हा एकदा समोर आली आहे. आपल्या मित्राच्या शेतात हुरडापार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी तेथे हजेरी लावत हुरड्यावर ताव मारला.
नागपूरच्या धनवटे नगर विद्यालयाच्या 1973 सालचे गडकरी विद्यार्थी आहेत. याच 73 च्या बॅचच्या जुन्या सहकाऱ्यांनी नागपूर जवळच्या बेसा गावात हुरडा पार्टीचा बेत आखला होता. या हुरडा पार्टीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून हजेरी लावली. विद्यालयातील जुने मित्र व शिक्षकांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यावेळी हुरड्यावर ताव मारला.
हेही वाचा - 'मुस्लिम आरक्षणाचा 5 वर्षांपूर्वीच निर्णय झाला होता; आता त्या शब्दाची वचनपूर्ती'