नागपूर : "आज शेतीवर होणार खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. हा खर्च कमी केल्याशिवाय शेतकऱ्यांचा उद्धार होऊ शकणार नाही. पूर्वी 85 टक्के लोक हे शेती करायाचे. आज 30 टक्के लोक हे शहराकडे वळले आहे. मात्र एक दिवस येईल, की लोक परत मुंबई दिल्ली यासारखे शहर सोडून गावाकडे जातील. स्मार्ट व्हिलेजकडे जाईल" असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले. एबीव्हीपीच्या 66व्या राष्ट्रीय अधिवेशनात होत असलेल्या प्रा. यशवंतराव केळकर पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
आयटीमधील नोकरी सोडून शेती करणाऱ्याचा सत्कार..
या कार्यकाचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. यावेळी एबीव्हीपीचे अध्यक्ष छगन भाई पटेल, राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी उपस्थित होते. यावेळी बिहार राज्याचे मनीष कुमार यांनी आयटीतून शिक्षक घेऊन अमेरिकेतून आलेली नोकरी सोडून गावात जाऊन शेती क्षेत्रात काम केले. त्यांच्या या कार्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हस्ते रोख एक लाख रुपये रोख पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शेतीमध्ये सुधारणेची गरज..
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की कृषी क्षेत्रात चांगले काम करण्याची गरज आहे. कापूस स्वस्त कापड महाग, संत्रा स्वस्त ज्यूस महाग आहे. शेतकरी उत्पादन घेणाऱ्या वस्तूला किंमत मिळत नाही आहे. शेतीला लागणार खर्चात प्रचंड वाढ होत आहे. बियाण्यांच्या किंमतीत वाढ होत आहे. रासायनिक खते, पेस्टसाईडच्या किमती वाढत आहे. पण शेतमालाच्या किमतीत वाढ झालेली नाही. पण मला आनंद आहे, की मनीष कुमार सारखे युवक काम करत आहे. खेड्यात जाऊन शेती क्षेत्रात संधी शोधत आहे.
शिक्षित लोकांनी गावाकडे जावे..
यावेळी पुरस्कार प्राप्त मनीष कुमार यांनी शेती परिस्थितीवर बोलताना म्हणाले, एक किलो तांदुळासाठी एक करोड मेट्रिक करोड धान निर्यात म्हणजे जवळपास 40 ते 50 लाख करोड लिटर पाणी आपण निर्यात केले. पण पाण्याची किंमत नसल्याने आपण लक्ष देत नाही. पण यावर विचार केल्यास पीक पद्धती बदलवने गरजेची आहे. यावर निराकरण करण्याचे काम सरकारने केले पाहिजे. युवा पिढीने योगदान देतांना गावाकडे गेले पाहिजे. जो पर्यंत शिक्षित लोक गावाकडे जाणार नाही तो पर्यंत काही साध्य होणार नाही. शिक्षा ताकदीवर बनते, आजचे शिक्षण हे युवकांना कमजोर करत असल्याचे मतही मनीषकुमार यांनी बोलून दाखवले.
हेही वाचा : ज्या देशाकडे युवा शक्ती, त्याच देशाचे भविष्य असणार - सरकार्यवाहक भय्याजी जोशी