ETV Bharat / state

नागपुरात आल्यास धिंड काढण्यात येईल; संजय राऊतांना भाजयुमोचा इशारा - BJP Yuva Morcha nagpur news

छत्रपती उदयनराजे भोसलेंना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी वातावरण तापले आहे. याचे पडसाद नागपुरातही पाहायला मिळाले. शुक्रवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

BJP Yuva Morcha warned for Sanjay Raut in nagpur
नागपुरात आले तर धिंड काढण्यात येईल; संजय राऊतांना भाजप जनता युवा मोर्चाचा इशारा
author img

By

Published : Jan 17, 2020, 9:13 PM IST

Updated : Jan 17, 2020, 9:25 PM IST

नागपूर - छत्रपती उदयनराजे भोसलेंना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नागपुरात चांगलेच वातावरण तापले. शुक्रवारी शहरातील महाल परिसरातील शिवाजी पुतळ्यासमोर संजय राऊत यांच्या फोटोला चपलांचा हार घालून फोटोला काळे फासत भारतीय जनता युवा मोर्चाने निषेध व्यक्त केला.

हेही वाचा - अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक

राऊत यांनी उदयनराजे भोसलेंना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरुध्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि शिवप्रेमी मावळे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला असताना आता यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने सुद्धा उडी घेतली आहे. छत्रपती महाराजांच्या गादीसंदर्भात संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य अपमानकारक असल्याचा आरोप करत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या फोटोला चपलांचा हार घालून फोटोला काळे फासले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही. सत्तेसाठी लाचारी पत्करून स्वतःला चाणक्य म्हणून घेणारे संजय राऊत नागपुरात आले, तर ज्याप्रमाणे त्यांच्या फोटोला चपलांचा हार घालून काळे फासून धिंड काढण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांचीसुध्दा धिंड काढण्यात येईल, असा इशारा नागपूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवानी दाणी यांनी दिला आहे.

Intro:शिवसेना पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बेताल वक्त्याव केल्यानंतर त्यांच्या विरुध्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि शिवप्रेमी मावळे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगल असताना आता या मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा ने सुद्धा उडी घेतली आहे...छत्रपती यांच्या गादी संदर्भात संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य अपमानकारक असल्याचा आरोप भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील शिवाजी पुतळ्यासमोर संजय राऊत यांच्या फोटोला चपलांचा हार घालून फोटोला काळ फासल आहे

Body:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही,सत्तेसाठी लाचारी पत्करून स्वतःला चाणक्य म्हणून घेणारे संजय राऊत नागपुरात आले तर आज ज्या प्रमाणे त्यांच्या फोटोला चपलांचा हार घालून काळ फासला आहे,त्याच प्रमाणे त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा नागपूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवानी दाणी यांनी दिला आहे

बाईट- शिवानी दाणी- अध्यक्ष,भाजयुमो,नागपूर

Conclusion:
Last Updated : Jan 17, 2020, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.