नागपूर - नागपूर जिल्हातील मौदा पोलीस ठाण्याच्या समोरचं संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी आरोपीला चोप ( BJP workers beat Supervajar ) दिल्याची खळबळजनक घडली आहे. आरोपी हा मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथाळा भागातील खासगी कंपनीत कामाला आहे. रघुवेंद्र उपाध्याय असे आरोपीचे नाव असून तो सोबत काम करणाऱ्या सहकारी महिलेची छेड काढून वारंवार व्हिडीओ कॉल ( Porn video chat with woman ) करून लज्जास्पद वर्तन करत होता.
महिलेला अश्लील व्हिडीओ चॅट -आरोपी हा वारंवार पिडीत महिलेच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत होता. तो महिलेला अश्लील व्हिडीओ चॅट ( Porn video chat ) करण्यास भाग पाडत असल्याने महिलेने मौदा पोलीस ठाण्यात ( Mauda Police Station Nagpur ) तक्रार दाखल केली होती. मौदा पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात आणले असता आधीच तयारीत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.
आरोपीला अटक - आरोपीवर अचानक झालेल्या पोलिसांची तारांबळ उडाली, पोलिसांनी आरोपी रघुवेंद्रला जमावाच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे. या घटनेमुळे मौदा पोलीस स्टेशन येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करत तपास सुरू केला आहे.
अश्लिल व्हिडीओ चॅट करण्याची मागणी - पीडित महिला आणि तिचा पती दोघेही नागपुर शहरातील वाठोडा भागात राहतात. पती-पत्नी एकाचं कंपनीत कामाला आहेत तर, रघुवेंद्र उपाध्याय नामक आरोपी सुपर-वायझर काम करायचा. याचदरम्यान आरोपी रघुवेंद्र याने पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला फारसा प्रतिसाद देत नसल्याने आरोपीने महिलेला व्हिडीओ कॉल करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याचं दरम्यान आरोपीने माझ्यासोबत व्हिडीओ चॅट करताना नग्न व्हावे लागेल अन्यथा तुझ्या नवऱ्याला नवऱ्याला जीवे मारेल अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित महिला घाबरली होती तिने सर्व प्रकार नवऱ्याला संगीतल्यानंतर त्यांनी मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कामावरही द्यायचा त्रास - आरोपी रघुवेंद्र उपाध्याय हा पीडित महिलेला कंपनीत एकट्यात गाठून तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. गेल्याकाही दिवसांपासून त्याचा त्रास वाढला होता अशी, माहिती पीडित महिलेने तक्रारीत दिली आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी दिला चोप - आरोपीच्या अटकेसाठी पोलीस स्टेशन समोर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी पोलीस कर्मचारी आरोपींला अटक करून ठाण्यात नेत असताना संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी आरोपी रघुवेंद्र उपाध्यायवर हल्ला करून त्याला चांगलाचं चोप दिला.