ETV Bharat / state

BJP Women Officer Murder : भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या हत्ये प्रकरणी माहिती देणाऱ्याला नागपूर पोलीस देणार एक लाखांचे बक्षीस

भाजपच्या स्थानिक महिला नेत्याच्या हत्या प्रकरणात नागपूर शहर पोलिसांचे सर्वच प्रयत्न आता अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलंय. (BJP Women Officer Murder case) (Nagpur Police)

Murder
Murder
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 2:30 PM IST

नागपूर: गेल्या ३० दिवसांपासून नागपुरातील एक भाजपा नेत्या बेपत्ता आहेत. या दरम्यान त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपी अमित शाहूने दिली असली तरी अद्याप त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नागपूर पोलिसांनी या हत्या प्रकरणात साक्ष-पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. जोपर्यंत मृतदेह मिळत नाही तोपर्यंत केस मजबूत होणार नाही. हे माहीत असल्याने आता या प्रकारणाची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचं जाहीर केले आहे. ही घोषणा मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी केली. (BJP Women Officer Murder case) (Nagpur Police)

नार्को चाचणीच्या अर्जावर निकाल बाकी: भाजप महिला नेत्यांच्या हत्या प्रकरणाचा गुंता वाढतंच आहे. हत्येच्या ३० दिवसानंतरही त्यांचा मृतदेह मिळालेला नाही. त्यामुळे हत्येचं गूढ उकलण्याऐवजी वाढतंच आहे. त्यांचा मृतदेह किंवा मोबाईल फोन मिळत नसल्याने हतबल झालेल्या नागपूर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी अमित शाहूची नार्को चाचणी करण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप अर्जावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही.

मोबाईलमध्ये दडले आहेत राज : या हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांना अद्यापही पाहिजे तसं यश मिळालेलं नसल्याने आता नागपूर पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास सुरू केलेला आहे. ही हत्या होऊन आता जवळजवळ ३० दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. या महिला नेत्याचा मृतदेह आणि मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यांच्या मोबाईलमध्ये खूप काही दडलं असावं म्हणून आरोपींनी त्यांचा मोबाईल नष्ट केल्याचा संशय नागपूर पोलिसांना आहे.

गुगलची मदत ठरू शकते महत्वाची: या हत्या प्रकरणात मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. म्हणून नागपूर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी गुगलकडे मदत मागितली आहे. महिला नेत्याच्या मोबाईलमध्ये अनेक रहस्य दडलेले असू शकतात. अनेक चेहरे देखील पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मोबाईल डेटावरचं लक्ष केंद्रित केलं आहे. जर त्यांच्या मोबाईलचा डेटा हा क्वाउड किव्हा गुगल ड्राईव्हवर स्टोअर असल्यास गुगलच्या मदतीने रिकव्हर केला जाऊ शकतो. म्हणून पोलिसांनी यासंदर्भात गुगलकडे मदत मागितली आहे.

आमदाराची झाली चौकशी: या हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातील तेंदुखेडाचे काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांची २४ ऑगस्ट रोजी सलग तीन तास चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी या हत्या प्रकरणाचे मुख्य आरोपी अमित शाहू आणि रवी शंकर यादव यांना आमदार संजय शर्मा यांच्यासमोर बसवून चौकशी करण्यात आली. हत्या केल्यानंतर आरोपींनी संजय शर्मा यांच्या सोबत संपर्क केला होता. त्यानंतर संजय शर्मा यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय नागपूर पोलिसांचा आहे. यासंदर्भात आमदार संजय शर्मा यांना तपास अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. तीन तासांच्या चौकशी नंतर संजय शर्मा यांनी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हंटल आहे.

आरोपी अमित आमदाराकडे होता कामाला: या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित शाहू आमदार संजय शर्मा यांच्याकडे पंधरा वर्षांपूर्वी कामाला होता. काम सोडल्यानंतर तो माझ्या संपर्कात नसल्याची माहिती संजय शर्मा यांनी दिली आहे. हत्येनंतर अमित शाहू सोबत भेट झाली; पण त्याने यासंदर्भात मला कोणतीही माहिती दिली नसल्याचे ते म्हणाले आहेत. दुसरे आरोपी रवी शंकर यादव यांना मी ओळखतो. ते ठेकेदार आहेत, त्यांना ओळखतो असल्याची कबुली आमदार संजय शर्मा यांनी दिली आहे. त्यांनी नागपूर पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा:

  1. Nagpur Murder case : महिला हत्या प्रकरणात आरोपीसह काँग्रेस आमदार संजय शर्माची समोरासमोर चौकशी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.