नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (गुरुवार) पक्षाचा नवा झेंडा लाँच केला आहे. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा उपयोग करण्यात आला आहे. मनसेचा झेंडा जाहीर होताच याला विरोध सुरू झाला असून, यावर भाजपनेसुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवमुद्रा ही राजकीय वापर करण्यास योग्य नाही. शिवमुद्रा ही आपली मिळकत आहे, राजकीय पक्षाने त्याचा वापर केला आहे. त्याविषयीची भूमिका राज्य सरकार व निवडणूक आयोग निश्चित करेल, असं मत भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - 'मनसेने झेंड्यावर राजमुद्रा वापरल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार'
राज ठाकरे यांची भूमिका अनेकवेळा स्पष्ट नसते. त्यामुळे शिवमुद्रा घेण्यापेक्षा आपली राजकीय भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट करावी असेही व्यास म्हणाले. राज यांनी सीएए आणि एनआरसीबाबत बाबतची भूमिका या अधिवेशनात स्पष्ट करावी, अशीही मागणी व्यास यांनी केली. सोबतच सावरकर यांच्याबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे, पण राज यांनी देखील त्यांची सावरकरांबाबत भूमिका अधिवेशनात मांडावी, असेही व्यास यावेळी म्हणाले.
हेही वाचा - मनसेचा झेंडा वादात; मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल