नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष कुणाला मैदानात उतरवेल या संदर्भात अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अंतिम क्षणी काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी देऊन मुख्यमंत्र्यांना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवारी मिळाल्यानंतर देशमुख यांनी देखील आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे भाजप आशिष देशमुख यांचे आवाहन मानायलाच तयार नाही. ते लाखाच्यावर मताधिक्याने पराभव स्वीकार करण्यासाठीच निवडणूक लढवत असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत.
काँग्रेसनंतर भारतीय जनता पक्ष आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेस पर्यंतचा प्रवास करणारे आशिष देशमुख वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे विदर्भद्रोही असल्याचा आरोप करतच देशमुख यांनी निवडणुकीत उडी घेतली होती. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने देशमुख यांना उमेदवारी दिल्यापासूनच ते आक्रमनाच्या भूमिकेत आहेत. आता तर निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी आरोपांच्या फैरी झाडतच प्रचाराला सुरुवात केली आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुध्दा त्यांनी मतदारसंघाचा विकास केला नाही. नागरिकांच्या जीवनात आर्थिक समृद्धीच्या यावी याकरता त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. म्हणूनच दक्षिण-पश्चिमच्या मतदाराने जबरदस्त परिवर्तनाचा विचार पक्का केल्याचा दावा देशमुख करत आहेत.
हेही वाचा - शिवस्मारकाची घोषणा झाली मात्र इंचभरही बांधकाम नाही - शरद पावार
राज्यातील प्रत्येक मतदारसंघात प्रचाराचा डोलारा मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः सांभाळत आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात ते केवळ दोनच सभा घेणार आहेत तर, केवळ एक रोड शो करणार असल्याचे ठरले आहे. फडणवीसांना त्यांचा मतदार हा जवळून ओळखतो. राज्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने फडणवीसांच्या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते 'मी सुद्धा देवेंद्र' या नावाने प्रचार करत आहे. मुख्यमंत्री जरी राज्याच्या प्रचारात व्यस्त असले तरी त्यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे संदीप जोशी यांनी फडणवीसांना लाखाच्या मताधिक्याने विजयी कारण्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच ते आशिष देशमुख यांना आवाहन मानायला देखील तयार नाहीत, असे म्हटले जात आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकारीच बोलतील - जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे