नागपूर - जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात रविवारी (दि. 14 मार्च) सकाळी कॉलरवाली वाघिणीचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. यात कऱ्हांडला प्रवेश द्वारापासून एक किलोमीटरवर आतल्या भागात गस्तीदरम्यान ही घटना उघडकीस आली.
उमरेड कऱ्हाडला परिसरात सकाळच्या सुमारास गस्त सुरू असताना कॉलरवाल्या वाघिणीचा एक बछडा मृतावस्थेत आढळून आला. मृताअवस्थेत आढळेला बछडा हा स्थानिक टी-1 या वाघिणीचा आहे. हा बछडा अंदाजे 6 ते 7 महिन्यांचा असल्याचे बोलले जात आहे. या अभयारण्यातील टी वाघीण ही टी-9 या वाघासोबत याच परिसरात फिरत असताना दिसून आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील आहे हा वाघ
चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून टी-9 हा वाघ उमरेड कऱ्हांडला येथे मागील वर्षात आला आहे. तेव्हापासून तो आपली टेरोटरी तयार करत स्थायिक झाला आहे. पर्यटनाला आलेल्या काही पर्यटकांना वाघाचे सायटिंग झाले आहे. यावेळी टी-9 वाघ आणि टी-1 वाघीणसोबत दिसून आले असल्याचे सांगितले जात आहे. वाघिणीसोबत मिलनापूर्वी हा बछड्याला मारल्याची अधिक शक्यता या घटनेच्या बाबतीत व्यक्त केली जात आहे.
स्वजातीय भक्षण
नर वाघ एखाद्या मादीसोबत मिलनाच्या प्रतिक्षेत असतांना किंवा दुसऱ्या वाघाची पिल्ले असल्यास अशा घटना घडतात. तसेच भविष्यात स्पर्धा नको म्हणून नर पिल्ले मारून टाकतात. कधी-कधी खातही असल्याचे पुढे आले आहे. याला स्वजातीय भक्षण म्हणतात हे प्रकार नेहमीच प्रकाशात येत नाही. पण, जंगलात असे अनेकदा घडून जाते. प्राथमिकदृष्ट्या उमरेड कऱ्हांडला घडलेला प्रकार हा यातून घडला असावा, अशी माहिती वन्य जीव अभ्यासक पराग दांडगे यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना दिली.
हेही वाचा - विद्युत विभागाने तोडलेले विद्युत कनेक्शन 'आप'ने पुन्हा जोडले
हेही वाचा - आर्थिक विवंचनेतून फेसबुक लाईव्ह करत कलाकाराचा आत्महत्येचा प्रयत्न