ETV Bharat / state

नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथनाट्याद्वारे जनजागृती - nagpur municipal corporation news

नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता र‌ॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले.

awareness-through-street-plays-by-municipal-corporation-employees-in-nagpur
नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथनाट्याद्वारे जनजागृती
author img

By

Published : Dec 5, 2020, 8:47 PM IST

नागपूर - स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याकरिता नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता र‌ॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील हनुमान नगर झोनसह इतरही भागात या र‌ॅलीचे आयोजन करत स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. शिवाय मास्क वापरण्याबाबत पथनाट्य सादर करून त्याचे फायदेही यावेळी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नागपूर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली

पथनाट्याद्वारे स्वच्छता व मास्कबद्दल जनजागृती -

कोरोनाच्या या काळात स्वच्छता किती महत्त्वाची आहे. हे पटवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडून विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येतात. आता थेट मनपा कर्मचाऱ्यांकडूनच रस्त्यावर उतरत पथनाट्याद्वारे नागरिकांमधे जनजागृती करण्यात येत आहे. या पथनाट्याद्वारे स्वच्छता व मास्क घालणे किती महत्वाचे आहे, हे समजावून सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही मोहिम नागपूरातील सर्वच भागात राबविल्या जाणार आहे. परंतु, आज पार पडलेल्या र‌ॅलीला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. शिवाय मनपा कर्मचारीदेखील या मोहिमेत चांगलेच गुंतल्याचे दिसून आले. अशावेळी कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी व स्वतः काळजी घेण्यासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक असाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. एकंदरीतच या र‌ॅली व पथनाट्य मोहीमेतून नागरिकांना मनपा कर्मचाऱ्यांकडून थेट आवाहन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांवरदेखील याचा परिणाम होईल, असा आशावाद मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

हेहा वाचा - नितेश सरडा आणि फिरोज शेख यांनी जामीन अर्ज घेतला मागे, पुनर्विचार याचिकेबाबत अद्याप निर्णय नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.