ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंनी खरी स्थिती जाणून घेऊनच वक्तव्य करावे, अनुराग ठाकूरांचा सल्ला

author img

By

Published : Jan 3, 2020, 4:48 PM IST

केंद्राकडे जीएसटीची मोठी रक्कम थकलेली असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावरुन मोठे राजकारण झाल्यानंतर आज केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकून यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर दिले आहे.

Anurag thakur
अनुराग ठाकूर

नागपूर - केंद्राकडे जीएसटीची मोठी रक्कम थकलेली असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावरुन मोठे राजकारण झाल्यानंतर आज केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकून यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी नेमकी स्थिती जाणून घेतल्यानंतरच भाष्य करावे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र आणि केंद्र सरकार दरम्यान जीएसटीच्या थकबाकीबद्दल नेमकी स्थिती काय आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा केंद्राकडे जीएसटी चा 15 हजार कोटी रुपयांचा वाटा शिल्लक असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनतर आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांनी आपल्या अर्थ मंत्र्यांकडून या मुद्द्यावर खरी स्थिती जाणून घ्यावी, आणि मगच भाष्य करावे असा सल्ला दिला आहे.

नुराग ठाकूरांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

आज नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ठाकूर बोलत होते. यावेळी त्यांनी जीएसटीच्या थकबाकीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना सुनावले. अनुराग ठाकूर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना नवीन जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना काही तरी बोलावेच लागणार आहे. मात्र, वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या अर्थमंत्र्यासोबत एकदा चर्चा करावी. त्यानंतर ते असे वक्तव्य करणार नाहीत असे अनुराग ठाकूर म्हणाले. जीएसटी सर्व राज्यांच्या संमतीने अंमलात आला असून आता त्याचे संकलन 1 लाख कोटींच्यावर गेले आहे. हे केंद्र आणि राज्यांचे संयुक्त यश आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य करताना पूर्वी जरी ते पदावर नव्हते मात्र आता ते पदावर आहेत याचे भान ठेवावे असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.

Intro:शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे जीएसटीची मोठी रक्कम थकलेली असल्याचे सांगितले होते,त्यावरून मोठे राजकारण झाल्यानंतर आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी यावर भाष्य केले आहे....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी नेमकी स्थिती जाणून घेतल्यानंतरच भाष्य करावे असं म्हंटल आहे Body:महाराष्ट्र आणि केंद्र सरकार दरम्यान जीएसटीच्या थकबाकी बद्दल नेमकी स्थिती काय आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे महाराष्ट्राचा जीएसटी चा 15 हजार कोटी रुपयांचा वाटा शिल्लक असल्याचे म्हंटल्या नंतर आता केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांनी आपल्या अर्थ मंत्र्यांकडून या मुद्द्यावर खरी स्थिती जाणून घ्यावी मग भाष्य करावे असा सल्ला दिला आहे.. आज नागपूरात प्रेस कोफ्रेंस ला संबोधित करताना अनुराग ठाकूर यांनी जीएसटी च्या थकबाकीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे... अनुराग ठाकूर म्हणाले की उद्धव ठाकरे यांना नवीन जबाबदारी मिळाली आहे.. त्यामुळे त्यांना काही तरी बोलावेच लागणार आहे.. मात्र वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या अर्थ मंत्र्यासोबत एकदा चर्चा करावी.. त्यानंतर ते असे वक्तव्य करणार नाही असे अनुराग ठाकूर म्हणाले.. जीएसटी सर्व राज्यांच्या संमती ने अमलात आला असून आता त्याचे संकलन 1 लाख कोटींच्या वर गेले आहे.. हे केंद्र आणि राज्यांचे संयुक्त यश आहे.. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य करताना पूर्वी जरी ते पदावर नव्हते मात्र आता ते पदावर आहेत याचे भान ठेवावे असा टोला ही लगावला आहे...

बाईट - अनुराग ठाकूर, केंद्रीय अर्थ राज्य मंत्रीConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.