ETV Bharat / state

कोविड-19 महामारीत रुग्णवाहिका व्यवसाय संकटात; 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट - रुग्णवाहिका बातमी

शहरात असलेल्या ३८७ पैकी सुमारे ३२ रुग्णवाहिका या शासनाकडून चालवल्या जात असलेल्या तर उर्वरित २३३ रुग्णवाहिका शहरातील विविध खासगी रुगणालयात आणि रुग्णवाहिकांचा व्यवसाय करणाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. याशिवाय नागपूर ग्रामीण भागातील २३९ पैकी १४ तालुक्यात १६ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, तर ग्रामीण भागात २२३ खासगी रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

कोविड-19 महामारीत रुग्णवाहिका व्यवसाय संकटात; 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट

author img

By

Published : Aug 3, 2020, 11:48 AM IST

नागपूर - कोरोना महामारीच्या संकटात वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाचे योगदान विसरता येणार नाही. कोविड-19 च्या निमित्ताने आपली आरोग्य व्यवस्था कितपत सक्षम आहे याचीदेखील प्रचिती आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आपला देश ज्या अदृश्य विषाणूंशी लढतो आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ही लढाई वाटली तितकी सोपी कधीच नव्हती म्हणूनच आपल्या देशातील आरोग्य यंत्रणेतील संसाधनांची अपुरी व्यवस्था या निमित्ताने पुढे आली आहे. रुग्णांसाठी बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत असताना रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहचवणाऱ्या रुग्णवाहिकेची उपलब्धता किती आहे हेदेखील तपासून बघणे गरजेचे झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात सामान्य नागरिकांना एका हाकेवर रुग्णवाहिका परवडणाऱ्या दरात उपलब्ध होते का, याचा आढावा घेण्याचा 'ईटीव्ही भारत'ने प्रयत्न केला आहे.

राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर सर्वांगाने देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर सर्व सोयींनी उपलब्ध आहे. कोरोना महामारीचा सामना करताना गेल्या पाच महिन्याच्या काळात नागपूर शहरात तब्बल सहा हजार रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे इतर रुगणालयातील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने याचा थेट फटका खासगी रुग्णवाहिका व्यवसायाला बसला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण ६२२ रुग्णवाहिका असल्याची नोंद आरटीओ कार्यालयात आहे. त्यापैकी ३८७ रुग्णवाहिका या शहरात कार्यरत असल्याची माहिती आहे, तर २३९ रुग्णवाहिका या ग्रामीण नागपुरात कार्यरत आहेत.

शहरात असलेल्या ३८७ पैकी सुमारे ३२ रुग्णवाहिका या शासनाकडून चालवल्या जात असलेल्या तर उर्वरित २३३ रुग्णवाहिका शहरातील विविध खासगी रुगणालयात आणि रुग्णवाहिकांचा व्यवसाय करणाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. याशिवाय नागपूर ग्रामीण भागातील २३९ पैकी १४ तालुक्यात १६ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, तर ग्रामीण भागात २२३ खासगी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. याशिवाय राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवेअंतर्गत किती रुग्णवाहिका कार्यरत आहेत, याचा आकडा मात्र आरटीओ कार्यालयाकडे उपलब्ध नाही. कोरोना महामारीच्या काळात रुग्णवाहिका दर अव्वाच्या सव्वा आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत असताना शासनाने निर्धारित केलेले दर किती आहेत याचा देखील आढावा आम्ही घेतला. नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक ते २५ किलोमीटर अंतरापर्यंत खालीलप्रमाणे रुग्णवाहिकांचे दर निश्चित केले आहेत.

०१) मारुती- ५०० रुपये
०२) टाटा सुमो- ५५० रुपये
०३) विंगर- ६०० रुपये
०४) टेम्पो ट्रॅव्हलर ७०० रुपये

वरीलप्रमाणे दर निर्धारित केले आहेत, तर महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर प्रति किलोमीटर १० रुपये प्रमाणे दर आकारले जाणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या दरासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना कल्पना नसल्याने खासगी रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालयांकडून दुप्पट ते तिप्पट दर आकारले जातात. मात्र, सध्या रुग्णांची संख्या अचानक कमी झाल्याने व्यवसाय ४० ते ५० टक्यांची कमी झाल्याची माहिती रुग्णवाहिका चालकाने दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनाचा धोका आणखी गडद होत आहे. मात्र, आम्ही अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्याने आम्ही कुठल्याही परिस्थितीत सेवा देण्यासाठी सज्ज आहोत. मात्र, आता आम्हाला सुद्धा संक्रमणाची भीती वाटू लागल्याचे मत रुग्णवाहिका चालकाने व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.