ETV Bharat / state

नागपूर : विविध मागण्यांसाठी आशा वर्कर आणि गतप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे आंदोलन - नागपूर आशा वर्कर आंदोलन बातमी

आज संपूर्ण राज्यभरात आशा वर्कर आणि गतप्रवर्तक कर्मचारी संघटनाच्यावतीने आंदोलन केले जात आहे. नागपूरच्या संविधान चौकात आयटक आणि सिटू या दोन कामगार संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

agitation by Asha Workers for various demands in nagpur
नागपूर : विविध मागण्यांसाठी आशा वर्कर आणि गतप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे आंदोलन
author img

By

Published : Jun 15, 2021, 3:02 PM IST

नागपूर - विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण राज्यभरात आशा वर्कर आणि गतप्रवर्तक कर्मचारी संघटनाच्यावतीने आंदोलन केले जात आहे. नागपूरच्या संविधान चौकात आयटक आणि सिटू या दोन कामगार संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

या आहेत मागण्या -

आशा वर्कर आणि गतप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी म्हणून नियुक्ती द्या, कोविड 19 चा कामाचा मोबदला प्रति दिवस 300 रुपये विनाविलंब द्या, आरोग्य सेवा पदभरतीमध्ये आशा व गतप्रवर्तकांना 50 टक्के आरक्षण द्या, यासह अन्य काही मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात आशा वर्कर्सने घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम केले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. मात्र, सरकारकडून आशा वर्कर्सकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. संकटाची पर्वा न करता कोरोनाकाळात अविरतपणे सेवा देणाऱ्या आशा वर्कर्सला मानधन नाही, तर 21 हजार रुपये पगार देण्यात यावा, 50 लाखांचा विमा काढण्यात यावा, अश्या मागण्याही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या.

आशा वर्करही संपावर -

आशा वर्कर विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर गेल्या आहेत. यामध्ये राज्यातील ७० हजाराहून अधिक आशा वर्करचा सहभाग आहे. कोरोना काळात केंद्र सरकारकडून एक हजार रुपये मानधन वेळेवर मिळावे, आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावे. आशांना मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, ती मिळावी. तीन हजाराहून आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला असून सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जावी, या मागण्याही आशा वर्करकडून करण्यात आल्या.

हेही वाचा - मराठा समाजाला दिलासा - उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून करता येणार अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.