ETV Bharat / state

नागपुरात शाळा सुरू होताच पुन्हा बंद; विद्यार्थी घरात 'लॉक' - विद्यार्थी पुन्हा घरात 'लॉक'

नागपूर शहरात कोरोनाचा प्रकोप मध्यंतरी कमी झाल्याने सुरुवातीला ४ जानेवारीला वर्ग ८ ते १२पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांच्या शाळा फेब्रुवारी ७पासून सुरू झाल्या. मात्र शाळा सुरू होताच २३ फेब्रुवारीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा शाळा-महाविद्यालय बंद करण्यात आले.

विद्यार्थी
विद्यार्थी
author img

By

Published : Mar 27, 2021, 9:46 PM IST

Updated : Mar 28, 2021, 8:45 PM IST

नागपूर - कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागून वर्ष लोटले आहे. शाळा बंद असल्याने लहान मुलांना जवळजवळ वर्षभर झाले घरातच राहावे लागले आहे. यामुळे शाळा, कॉन्व्हेंट यांनी त्यासाठी पर्याय शोधत ऑनलाइन माध्यमाच्या साह्याने शिक्षण दिल्या जात आहे. यासाठी लॅपटॉप आणि मोबाइल हे पर्याय समोर आले आहे. जे मोबाइल मुलांनी अभ्यास करावा म्हणून दूर ठेवले होते. तेच मोबाइल आता अभ्यास करण्यासाठी लहान मुलांच्या हातात द्यावे लागले आहे. मात्र वर्ष संपत आले, खरच मुलं अभ्यास करतात का? पालकांचं काय चाललंय जाणून घेऊ या वृत्तातून..

शाळा सुरू होऊन पुन्हा बंद
नागपूर शहरात कोरोनाचा प्रकोप मध्यंतरी कमी झाल्याने सुरुवातीला ४ जानेवारीला वर्ग ८ ते १२पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर लहान मुलांच्या शाळा फेब्रुवारी ७पासून सुरू झाल्या. मात्र शाळा सुरू होताच २३ फेब्रुवारीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा शाळा-महाविद्यालय बंद करण्यात आले.

नागपुरात पुन्हा शाळा बंद

चार भिंतीत काढले वर्ष
मागील वर्षात कोरोनाच्या संकटाने लहान मुलांना पालकांनी घराबाहेर पडू दिले नाहीत. यामुळे मुलांना वर्ष बंद घरात गेले. आता परिस्थिती थोडी सुधारणा झाली डांबलेली मुले किमान अपार्टमेंट खाली उतरून खेळू लागली आहे. पण खेळत असताना ऑनलाइन अभ्यासाच्या वेळेचे पालन करायला मुले शिकली आहेत. दिवसभर अभ्यास केल्यानंतर ते इतर कामे करायला शिकली आहेत.

'लहान वयात मुले समजदार झालीत'
कोरोनाच्या संकटात काही अनुभव वाईट आलेत. तर काही चांगल्या बाजूसुद्धा समोर आल्या आहेत. मुले एकटे राहून स्वतः अभ्यास करायला शिकले आहे. तर काही मुले घरातील पालकांना मदत करत आहे. अभ्यासासोबत स्वतःपुरते काम करायला शिकले आहे.

'...तर पालकानांच परीक्षा द्यावी लागली'
ऑनलाइन अभ्यासामुळे पालकानांच परीक्षा द्यावी लागल्याचे समोर आले आहे. कारण मुलांना काही समजले नाही की लहान मुल आई-वडिलांना विचारतात. मात्र शिक्षक प्रत्यक्ष समोर नसल्याने पालकांच त्रास होत होता. त्यामुळे घरातील कामे आणि मुलांचा सांभाळ करताना परीक्षा पालकानांच द्यावी लागली, अशी परिस्थिती पाहायला मिळाली.

मोबाइल धोकादायक
लहान मुलांच्या हातात अभ्यासासाठी दिलेल्या मोबाइल सततच्या वापरामुळे पालकांची चिंता वाढवत आहे. यात बरेचदा माहितीअभावी मुले हे चुकीचे ऑप्शन निवडतात. कधी प्ले स्टोअरवर ऑनलाइन गेममुळे पैसे डेबिट झाल्याचे काही प्रकार पुढे आले आहे. मोबाइलचा उपयोग आदी प्रकार हे पालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पालकांचे मत आहे. आता परिस्थिती सुधारली असे वाटत असतांना पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढल्याने शाळा बंद झाल्या आहेत.

हेही वाचा-राज्यात आज आठ वाजल्यापासून जमावबंदी; 'हे' कडक निर्बंध लागू, सरकारकडून नवीन गाईडलाईन

Last Updated : Mar 28, 2021, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.