ETV Bharat / state

पुण्यानंतर आता नागपुरात गाड्या फोडण्याचे लोण, दुचाकी अन् रिक्षांचे लाखोंचे नुकसान - नागपूरात गाड्या फोडण्याचे लोण

नागपूरमधील वनदेवी नगर आणि धम्मदीप नगर येथे काही गुंडांनी रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि ऑटो रिक्षांच्या काचा फोडून अनेक गाड्यांची नासधूस केल्याची घटना घडली आहे.

nagpur
पुण्यानंतर आता नागपूरात गाड्या फोडण्याचे लोण, दुचाकी अन् रिक्षांचे लाखो रुपयांचे नुकसान
author img

By

Published : Feb 14, 2020, 12:39 PM IST

नागपूर - शहरातील वनदेवी नगर आणि धम्मदीप नगर येथे काही गुंडांनी रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि ऑटो रिक्षांच्या काचा फोडून अनेक गाड्यांची नासधूस केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आरोपींनी सर्वाधिक नुकसान हे दुचाकी आणि ऑटोचे केले आहे.

पुण्यानंतर आता नागपूरात गाड्या फोडण्याचे लोण, दुचाकी अन् रिक्षांचे लाखो रुपयांचे नुकसान

हेही वाचा -

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच क्राईम..! महिला डॉक्टरांवर अ‌ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न

या घटनेत आरोपींनी धारधार शस्त्र, लाकडी दांडके आणि दगड मारून गाड्या फोडल्या आहेत. असामाजिक तत्व असलेल्या काही आरोपींच्या एका गटाने हे कृत्य केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.