ETV Bharat / state

अधिक भावात स्टँम्प पेपर विकणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - जिल्हाधिकारी ठाकरे - ravindra thakare news nagpur

जिल्ह्यातील सर्व मुद्रांक पेपर विक्रेत्यांची बचत भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यापुढे कुठलीही तक्रार येता कामा नये, नियमानुसार मुद्रांक विक्री करण्यात यावी, असे स्पष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी निर्देश दिले.

action will be taken against who sell stamp paper at higher prices in nagpur
अधिक भावात स्टँम्प पेपर विकणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - जिल्हाधिकारी ठाकरे
author img

By

Published : Jun 17, 2021, 11:03 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांसंदर्भात (स्टँम्प वेंडर) मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन आज (गुरुवारी) शहरातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यापुढे मुद्रांक पेपर चढ्या भावाने, निर्धारित किंमतीपेक्षा अधिक दराने विकल्याच्या तक्रारी आल्यास किंवा अन्य गैरव्यवहार केल्याच आढळल्यास मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचे व कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.

नियमानुसार मुद्रांक विक्री करण्याचे निर्देश

नागपूर जिल्ह्यात सध्या 55 विक्रेते कार्यरत आहेत. या विक्रेत्यांना तीस हजारापर्यंत मुद्रांक पेपर विक्री करण्याची मर्यादा आहे. मोठ्या प्रमाणात ई -चलनच्या माध्यमातून अन्य मुद्रांकांची ऑनलाईन विक्री करण्यात येते. या छोट्या विक्रेत्यांना केवळ १०० व ५०० किंमतीचे स्टॅम्प पेपर विकण्याची मुभा आहे. मात्र गेल्या काही दिवसात जास्त किंमतीने मुद्रांक विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे सर्व मुद्रांक पेपर विक्रेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बचत भवनात पाचारण केले होते. यावेळी यापुढे कुठलीही तक्रार येता कामा नये, नियमानुसार मुद्रांक विक्री करण्यात यावी, असे स्पष्ट त्यांनी यावेळी निर्देश दिले.

वेबसाईटवर वितरण जाहीर करण्याचे विक्रेत्यांना निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर सध्या शहरात उपलब्ध असणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांच्या नावापुढे त्यांना देण्यात आलेल्या स्टॅम्प पेपर साठ्याची नोंद केली जाईल. तसेच अधिक किंमतीने स्टॅम्प विक्री केल्यास पोलीस विभागामार्फत कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.