ETV Bharat / state

Acid Attack Nagpur : बायकोला अद्दल घडवण्यासाठी नवऱ्यानेच केला बायकोवर ॲसिड हल्ला, गंभीर जखमी

नागपूर येथील रामेश्वरी भागात ( Rameshwari Area Of Nagpur ) एका महिलेवर तिच्या पतीनेच ॲसिड हल्ला ( Acid Attack On Wife ) केल्याची घटना घडली आहे. या घटनेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ती गंभीर जखमी झाली आहे. तर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Acid Attack Nagpur
तरुणीवर ॲसिड हल्ला
author img

By

Published : Jan 22, 2022, 12:25 PM IST

Updated : Jan 22, 2022, 3:43 PM IST

नागपूर: नागपूरात एका महिलेवर ॲसिड हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरातील रामेश्वरी भागात ही घटना घडली आहे. मोटारसायकलवरून येत तिच्या पतीनेच हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले ( Acid Attack On Wife ) असून, या हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

बायकोला अद्दल घडवण्यासाठी नवऱ्यानेच केला बायकोवर ॲसिड हल्ला, गंभीर जखमी

बायकोला अद्दल घडवण्यासाठी केला हल्ला

उपराजधानी नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज सकाळी सायकलने जात असलेल्या एका महिलेवर दुचाकीवरून आलेल्या एकाने ॲसिड सदृश्य द्रव्य फेकल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता अवघ्या काही तासात या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून, फिर्यादी महिलेचा नवरा असल्याची माहिती पुढे आली आहे. कौटुंबिक वादातून ते दोघेही वेगळे राहतात. त्याने बायकोला अद्दल घडवण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. सविता जेंगणे (३५) असे जखमी महिलेचे नाव आहे तर सुरेश जेंगणे (४०) असे आरोपीचे नाव आहे.

ॲसिड फेकून काढला पळ

आरोपी सुरेश जेंगणे हा प्लंबर म्हणून काम करतो. सविता आणि सुरेश यांच्यात वैयक्तिक कारणाने नेहमी वाद होत असल्याने पती- पत्नी विभक्त राहतात. आज सकाळी सविता कामावर जात असताना आरोपीने ॲसिडसदृश द्रव्य तिच्या चेहऱ्यावर फेकून पळ काढला. या हल्ल्यात जखमी असलेल्या सविता जेंगणे यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, भाजलेल्या जखमा काही वेळानंतर वाढू शकतात. त्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

नळ स्वच्छ करणाऱ्या द्रव्याचा वापर

आरोपी सुरेश जेंगणे हा प्लम्बिंगचे काम करत असल्यामुळे त्याला बाथरूमचे नळ स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणार्‍या ॲसिडची माहिती होती. बायकोला धडा शिकवण्याच्या उद्देशाने त्याने तेच ॲसिड सदृश द्रव्य पत्नीच्या चेहऱ्यावर फेकून पत्नीला जखमी केले, अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

घटनेचा सीसीटीव्ही आला पुढे

पोलिसांनी सविता जेंगणे यांच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची घटना घडल्याची माहिती समजताच अजनी पोलिसांनी तापस सुरू केला. तेव्हा ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा संपूर्ण घटनाक्रम दिसून आला. ज्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Last Updated : Jan 22, 2022, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.