नागपूर: दहावी परीक्षेच्या निकालात ( Ssc Board Result) नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) शाळांनी मोठी झेप घेतली आहे. हिंदी माध्यमाचा निकाल ९८.४५ टक्के, उर्दू माध्यमाचा निकाल ९९.७७ टक्के आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल ९९.३१ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. दीपकुमार मीना, श्री. राम जोशी आणि शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
जयताळा मराठी माध्यम शाळेची विद्यार्थिनी प्रगती धुरेंद्र मेश्राम हिने मराठी,हिंदी उर्दू आणि इंग्रजी या चारही माध्यमातून आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून ९२.६० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मन पटकाविला आहे. विवेकानंद नगर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी बरखा सुनील साहू हिने ८९.२० टक्के गुण प्राप्त करून हिंदी माध्यमातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. उर्दू माध्यमातून कामगारनगर उर्दू माध्यमिक शाळेची महेक खान कय्युम खान हिने ९०.८० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
इंग्रजी माध्यमातून जी.एम. बनातवाला मनपा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी आफरीन सदफ इरशद ९०.६० गुण प्राप्त करून प्रथम आली. दिव्यांग विद्यार्थ्यांमधून बुशरा हबीब खान जी.एम. बनातवाला मनपा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी प्रथम ठरली आहे. मराठी माध्यमातून दुर्गानगर माध्यमिक शाळेची सह्याद्री प्रवीण भुसारी ९२. ४० टक्के घेऊन द्वितीय आणि राममनोहर लोहिया शाळेची धनश्री राजेंद्र भेंडारकर ९१ टक्के घेऊन तृतीय राहिली आहे.
यंदाच्या निकालाचे वैशिष्टय म्हणजे चारही माध्यमांमध्ये प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणा-या सर्व मुलीच आहेत. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तुळशी रोप आणि मिठाई देऊन सत्कारकरण्यात आला.कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत करून प्राविण्य प्राप्त केले आहे. ही त्यांच्या यशाची पहिली पायरी आहे आणि त्यांना भविष्यात मोठा टप्पा गाठायचा आहे अशी भावना मनपा आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Aapali Bus Ticket Increase Nagpur : आपली बस सेवा महागली; प्रवाशांची तीव्र नाराजी