ETV Bharat / state

नागपुरात तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी 3 तरुणींसह 8 आरोपींना अटक - एक लाख रुपयांची मागणी

मैत्रीचे नाटक रचून एक लाख रुपयाच्या मागणीसाठी युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. आरापींमध्ये 3 तरुणींचादेखील समावेश आहे. संजय शाहू असे अपहरण करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाइलने कारवाई करून पीडित तरुणाची सुटका केली.

नागपूरात तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी 3 तरुणींसह 8 आरोपींना अटक
author img

By

Published : Jul 26, 2019, 6:39 PM IST

नागपूर - मैत्रीचे नाटक रचून एक लाख रुपयाच्या मागणीसाठी युवकाचे अपहरण केल्या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. आरापींमध्ये 3 तरुणींचादेखील समावेश आहे. संजय शाहू असे अपहरण करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

नागपूरात तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी 3 तरुणींसह 8 आरोपींना अटक

पीडित तरुण संजय शाहू यांची आरोपींपैकी रचना नावाच्या मुलीसोबत नुकतीच ओळख झाली होती. दरम्यान दोघांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले असता रचनाने संजयला भेटण्यासाठी बोलवले. संजय रचनाला भेटण्यासाठी गेले असता रचनाने त्यांना लाँग ड्राईव्हला जाण्याची गळ घातली. रचनाच्या इच्छेनुसार दोघेही अमरावती मार्गावरील वडधामना परिसरात गेले असता मागून आलेल्या काही आरोपींनी संजयचे अपहरण केले. त्या अपहरणकर्त्यांमध्ये रचना देखील सहभागी असल्याचे समजताच संजयला धक्का बसला.

संजयला गाडीत कोंबल्यानंतर आरोपींनी त्याला जबर मारहाण करून एक लाख रुपयांची मागणी केली. संजय पैसे देण्यासाठी तयार झाला आणि त्याने मित्राला फोन करून ही घटना सांगितली. संजयच्या मित्राने लगेचच पाचपावली पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदवली. पाचपावली पोलिसांनी देखील या प्रकरणात तत्परता दाखवून आरोपींना शोधण्यासाठी आपली दोन पथके तैनात केली. ज्या ठिकाणी खंडणीचे पैसे दिले जाणार होते तिथे पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. अखेर पाचपावली पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळाले. संजयचे अपहरण केल्या प्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 3 तरुणींचासुद्धा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाइलने कारवाई करून पीडित तरुणाची सुटका केली.

Intro:मैत्रीचे नाटक रचून एक लाख रुपयाच्या मागणीसाठी युवकाचे अपहरण केल्या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे,यामध्ये 3 तरुणींचा सुद्धा समावेश आहे...या प्रकरणात पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाइल कारवाई करून पीडित तरुणाची सुटका केली आहेBody:पीडित तरुण संजय शाहू यांची रचना नावाच्या सोबत नुकतीच ओळख झाली होती... दरम्यान दोघांच्या ओळखी चे रूपांतर मैत्रीत झाले असता रचनाने संजय ला भेटण्याकरिता बोलावले होते....संजय हे रचनाला भेटण्यासाठी गेले असताना रचनाने त्यांना लॉंग ड्राईव्हला जाण्याची गळ घातली ...रचनाच्या इच्छे नुसार दोघेही अमरावती मार्गावरील वडधामना परिसरात गेले असता मागून आलेल्या काही आरोपींनी संजयचे अपहरण केले....त्या अपहरणकर्त्यांमध्ये रचना देखील सहभागी असल्याचे समजताच संजयला धक्काच बसला... संजयला गाडीत कोंबल्या नंतर आरोपींनी त्याला जबर मारहाण केली करून एक लाख रुपयांची मागणी केली....संजय पैसे देण्यासाठी तयार झाला आणि त्याने मित्राला फोन करून ही घटना सांगितली...संजयच्या मित्राने लगेचच पाचपावली पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार नोंदवली पाचपावली पोलिसांनी देखील या प्रकरणात तत्परता दाखवून आरोपींना शोधण्याकरिता आपले दोन पथक तैनात केले होते ज्या ठिकाणी खंडणीचे पैसे दिले जाणार असे ठरले त्या ठिकाणी पोलिसांनी आपला सापळा रचला होता मात्र आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळाले....संजयचे अपहरण केल्या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे,यामध्ये 3 तरुणींचा सुद्धा समावेश आहे...या प्रकरणात पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाइल कारवाई करून पीडित तरुणाची सुटका केली आहेConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.