नागपूर - शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. कालपासून एकूण १८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.
सोमवारी दिवसभरात शहरातील ११ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आज मंगळवारी पुन्हा नवे सात रुग्ण पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी बळावला आहे. आज सकाळी आढळून आलेल्या रुग्णांना आधीच क्वारंटाईनमध्ये ठेवले होते. तसेच या रुग्णांचे सतरंजीपुरा, मोमीनपुरा कनेक्शन आहे. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपुरातील कोरोनाची सद्यस्थिती -
- एकूण पॉझिटिव्ह नमुने - 88
- मृत्यू - 01
- रुग्णालयातून डिस्चार्ज - 12
- रुग्णालयात उपचार सुरू - 76