नागपूर - जिल्ह्यात रुग्णसंख्या घटल्यानंतर सक्रिय रुग्णसंख्या घटून आता 616 वर येऊन पोहचली आहे. यात एप्रिल महिन्यात 78 हजारांच्या घरात रुग्णसंख्या जाऊन पोहचली असतांना मे पासून रुग्णसंख्या कमी-कमी होत असताना आता यात घट झाली आहे. यातही रुग्णालयात उपचार घेणारे रुग्णसंख्या 186 असून यांना सौम्य लक्षणे आहेत. यात मृत्युदर घटला असून मागील आठवड्यात सलग चार दिवस आणि या आठवड्यात दोन दिवस शहर आणि ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा नोंदवल्या गेले आहेत. यात बरे होण्याचा दर 97.98 टक्क्यावर आलेला आहे.
87 जण कोरोना मुक्त -
नागपूर जिल्ह्यात गुरुवारी आलेल्या अहवालात 6 हजार 647 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये 46 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. यात शहरी भागात 21 तर ग्रामीण भागात 24 बाधित रुग्णांचा समावेश आहे. शहर आणि ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू तर बाहेर जिल्ह्यातील एक रुग्ण दगावला आहे. मागील 24 तासात 87 जणांपैकी शहरातील 77 तर ग्रामीणचे 10 जण कोरोना मुक्त झाले आहे. सक्रिय रूग्णांममध्ये 616 पैकी 186 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 430 रुग्ण हे गृहविलगीकरणामध्ये आहेत.
सक्रिय रुग्णसंख्या घटून 616 -
आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्या घटून 616 वर आली आहे. शहरात 554 तर ग्रामीणमध्ये 62 रुग्ण सक्रिय आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 916 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 67 हजार 277 जण हे कोरोनातून बरे झाले आहे. यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 9023 वर जाऊन पोहचली आहे. नागपूरात सध्या बरे होण्याचा दर हा 97.98 टक्के इतका आहे.
सहा जिल्ह्यात 101 नवीनबाधित, 3 मृत्यू -
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 199 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 101 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 3 जण हे कोरोनाने दगावले आहे. तेच भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली या चार जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. यात कोरोना बाधितांच्या तुलेनेत 71अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.7 टक्के, तर पूर्व विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होऊन 0.65 इतकी झाली आहे.
हेही वाचा - #MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..