नागपूर - शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसें-दिवस वाढतच चालला आहे. आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये 2 जणांचा कोरोना अहवाल पॉझेटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधिचा आकडा 300 झाला आहे.
सोमवारी दिवसभरात नागपुरात 3 कोरोना बाधित रुग्ण वाढले होते. त्यानंतर आज (मंगळवारी) पुन्हा 2 रुग्ण वाढल्याने रुग्णसंख्या 300 वर गेली आहे. नव्याने कोरोना अहवाल पॉझेटिव्ह आलेले दोनही रुग्ण कंटेटमेंट झोनमध्ये असलेल्या मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसरातील आहे. या रुग्णांना आधीपासूनच क्वारंटाईन करण्यात आले होते.
एकीकडे कोरोनाबधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील समाधानकारक आहे. आतापर्यंत नागपुरात 93 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 4 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे