नागपूर - कोरोनामुक्त नागरिकांची संख्या वाढण्यासोबत नागपूरकर कोरोना लाटमुक्त होत चालले आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसगणी सुधारत जात असताना नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकही मृत्यू नसणारा हा दुसऱ्या लाटेतील पहिलाच दिवस आहे. काही दिवसांपूर्वी एक मृत्यू नोंदवला गेला होता. आता नागपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यात मागील 24 तासात कोरोनाने एकही मृत्यू झालेला नाही, ही आनंदाची बाब आहे.
नागपूर जिल्ह्यात शनिवारी आलेल्या अहवालात 10 हजार 013 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 197 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात 123 तर ग्रामीण भागातील केवळ 71 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 6 जण दगावले आहे. यामध्ये शहरी भागात 3, तर ग्रामीण भागात शून्य मृत्यूची नोंद आहे. तर जिल्हाबाहेरील 3 जण दगावले आहे. तेच 471 जणांपैकी शहरात 349 तर ग्रामीण 122 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात 1586 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 2 हजार 709 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे.
आतापर्यंतची परिस्थिती
आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घटून 4 हजार 295वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 75 हजार 597 जण रुग्ण कोरोनाबाधित झाले आहे. यातून 4 लाख 62 हजार 352 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 8949वर जाऊन पोहचला आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेट हा 97.22 टक्क्यांवर जाऊन रोज यात वाढ होत आहे.
सहा जिल्ह्यात 30 जण कोरोनाचे बळी
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 1 हजार 133 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 487 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 30 जण हे कोरोना आजाराचे बळी ठरले आहे. यात बाधितांच्या तुलेनेत 646 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 2.0 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 2.33वर आला आहे.
नागपूर ग्रामीणमध्ये मागील 24 तासात एकही मृत्यू नाही - Nagpur corona update
नागपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यात मागील 24 तासात कोरोनाने एकही मृत्यू झालेला नाही, ही आनंदाची बाब आहे.