नागपूर - कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरात लपून असलेल्या 12 व्यक्तींना केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे. नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी शहरातील कोरोनाबधितांची संख्या शंभर पार झाली आहे. यात सर्वाधिक म्हणजेच 50 हून अधिक रुग्णाची संख्या ही एकट्या सतरंजीपुरा परिसरातील आहे.
सतरंजीपुरा येथील 68 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या एका रुग्णाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने या परिसरात कोरोनाचा प्रदूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्यामुळे हा परिसर सील करून येथील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. परंतु नागरिक खरी माहिती न देता लपवून ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनात आल्यावर महापालिकेने त्या मृत रुग्णाच्या घराजवळील 30 कुटुंबातील सुमारे दीडशे जणांना सक्तीच्या विलगिकरणात ठेवले. असे करताना काही नागरिक इतरत्र लपून बसल्याची माहिती महापालिकेला मिळताच शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास अशा लपून असलेल्या नागरिकांना शोधून विलगिकरण केंद्रात रवाना करण्यात आले.