ETV Bharat / state

आजपासून बीकेसीत फिरा 'युलू बाईक'ने; एमएमआरडीएचा उपक्रम

author img

By

Published : Sep 2, 2020, 4:38 PM IST

वांद्रे-कुर्ला संकुलात अत्याधुनिक सुविधा व वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करत आहे. त्याचाच भाग म्हणून एमएमआरडीएने आजपासून बीकेसीमध्ये युलू बाईक सेवा सुरू केली आहे. आज एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

Yulu Bike
युलू बाईक

मुंबई - आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलात अत्याधुनिक सुविधा व वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करत आहे. त्याचाच भाग म्हणून एमएमआरडीएने आजपासून बीकेसीमध्ये युलू बाईक सेवा सुरू केली आहे. आज एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. विजेवर चालणारी ही बाईक भाड्याने उपलब्ध करून देण्यात येणार असून या युलू बाईकने बीकेसीत कुठेही फिरता येणार आहे. ज्याप्रमाणे भाड्याने सायकल वापरली जाते, त्याप्रमाणेच या युलू बाईकचा वापर करता येणार आहे. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक आणि कुर्ला रेल्वे स्थानकबाहेर या बाईक भाड्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

एमएमआरडीएने आजपासून बीकेसीमध्ये युलू बाईक सेवा सुरू केली

बीकेसीत दररोज नोकरी व कामाच्यानिमित्ताने 3 लाख लोकांची ये-जा असते. त्यामुळे बीकेसीत येणाऱ्यांच्या सोयीसाठी आता एमएमआरडीएने युलू बाईक ही संकल्पना आणली आहे. स्मार्ट वाहतूक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीकोनातून ही युलू शेअर बाईक योजना आणली आहे. एकूण 100 युलू बाईक एमएमआरडीएकडून विकत घेण्यात आल्या आहेत. वांद्रे पूर्व स्थानक आणि कुर्ला स्थानकाबाहेर युलू झोन तयार करण्यात आले आहेत. बीकेसीत अनेक ठिकाणी युलू बाईक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

कुर्ला किंवा वांद्रे स्थानकावरून पूढे ज्यांना बीकेसीत कुठेही जायचे असेल त्यांना ही बाईक भाड्याने घेता येईल. मात्र, त्यासाठी स्मार्ट फोन असणे गरजेचा आहे. यासाठी फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून युलू अ‌ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करत बाईकचा नंबर टाकून बाईकचे भाडे भरावे लागेल. मग ही बाईक घेऊन तुम्हाला प्रवास करता येईल. काम झाल्यानंतर बाईक ज्याठिकाणाहून घेतली तिथे पुन्हा जमा करून वापरलेल्या तासाप्रमाणे ई पेमेंट करावे लागेल.

दरम्यान, विजेवर चालणाऱ्या या युलू बाईक इको फ्रेंडली आहेत. त्यामुळे या बाईकचा अधिकाधिक लोकांनी वापर करावा. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मदत करावी, असे आवाहन महानगर आयुक्त राजीव यांनी केले. या नव्या सेवेला मुंबईकर कसा आणि किती प्रतिसाद देतात हे लवकरच समजेल.

सर्वसामान्यांना 'न' परवडणारी सेवा?

युलू बाईक ही संकल्पना चांगली आणि वेगळी असली तरी ती बीकेसीत येणाऱ्या सर्वांना परवडणारी आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाईकसाठी 5 रुपये भाडे असणार आहे, तर त्यापुढे प्रत्येक मिनिटासाठी दीड रुपये आकारण्यात येणार आहेत. एखाद्या व्यक्तीला कामासाठी 1 तास किंवा त्यापेक्षाही अधिक वेळ लागू शकतो. अशावेळी 5 रुपये आणि पुढे प्रत्येक मिनिटांसाठी दीड रुपये असे धरल्यास ही रक्कम जास्त होणार आहे. रिक्षा, बेस्ट बसपेक्षा जास्त दर यासाठी लागणार असल्याने याला कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल.

कोविड काळात घेणार 'ही' काळजी -

एमएमआरडीए आणि युलू कंपनीकडून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे कोविड काळात शेअरिंग बाईक सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संसर्ग होऊ नये यासाठी एमएमआरडीएने सर्व उपाययोजना केल्या असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व बाईक नियमित सॅनिटाईझ केल्या जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.