मुंबई : वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिटी बेकरीमागे निर्माणाधीन इमारतीनजीक एका 24 वर्षीय युवकाची हत्या (Youth Murder) करण्यात आली. मोबाईल चार्जिंग वरून (dispute and murder over mobile charging) झालेल्या वादाचे रुपांतर हत्येत झाल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. youth killed due to dispute, dispute over mobile charging in Worli Mumbai
गुन्हा दाखल - दीपक राजबार (वर्ष 24) असे मृत तरुणाचे नाव असून अटक आरोपीचे नाव सोनू (वर्ष 27) असे आहे. ही घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून आज सकाळी वरळी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत दीपक राजभार हा फायर फायटर वायर टाकायचे काम करत असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी दिली.
सिमेंटचा ब्लॉग डोक्यावर हाणला - हे दोघे देखील वरळी नाक्यावरील सिटी बेकरी मागे असलेला एका कन्स्ट्रक्शन साइटवर काम करत होते. काल रात्री खाऊन पिऊन आल्यानंतर त्या दोघांत मोबाईल चार्जिंगला लावण्यावरून वाद झाला आणि या वादातून सोनू याने सिमेंटच्या ब्लॉक दीपक याच्या डोक्यावर घातला. त्यानंतर नायर रुग्णालयात दीपकला नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे कोळी यांनी पुढे सांगितले.