ETV Bharat / state

न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी करा, युवकांची मागणी - मुंबई गुन्हे बातमी

न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी करावी, अशी मागणी फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर एकत्र आलेल्या काही युवकांनी केली आहे.

Loya
न्या. लोया
author img

By

Published : Feb 18, 2020, 6:10 PM IST

मुंबई - देशभर गाजलेल्या विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. बी. एच. लोया मृत्यू प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर एकत्र आलेल्या काही युवकांनी केली आहे. या युवकांनी मंगळवरी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लोया प्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी केली.

न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी करा

न्या. ब्रिजगोपाल लोया हत्यासंदर्भात जरी अंतिम निकाल आला असला, तरी या प्रकरणात बरेच पुरावे हे न्यायालयासमोर सादर करण्यात आले नाहीत. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूतून अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन अशोक पै, समीर रोहेकर या युवकांनी या संदर्भात मागणी केली.

  • काय आहे मागणी -

सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणी सीबीआय न्यायाधीश म्हणून न्या. लोया न्यायदानाचे काम पाहत होते. मात्र, त्यांच्या मृत्यूच्या 8 दिवसापूर्वीच त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली होती. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक दाखविण्यात आला होता. मात्र, न्यायालयात त्यांचा ईसीजी रिपोर्ट दाखवण्यात आलेला नाही. लोया यांच्या मृत्यूच्या दिवशी त्यांना नागपुरातील दांडे रुग्णालयात रिक्षाने नेण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूची नोंद ही सकाळी 6.10 मिनिटांची आहे. तर त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी 5 वाजता त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे या तरुणांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.