ETV Bharat / state

Devendra Fadnavis Birthday : सर्वात तरुण महापौर ते मुख्यमंत्री; जाणून घेऊया देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास

महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वजनदार नेते आहेत. सर्वात तरुण वयात महापौर झालेल्या फडणवीसांनी राजकारण आणि पक्ष पातळीवर वेगवेगळ्या भुमिकांना न्याय देत थेट मुख्यमंत्री पद पटकावले. राजकीय घडामोडीत नंतर त्यांना पुरेसे संख्याबळ असताना विरोधीपक्षात बसावे लागले. पण त्यावर मात करत त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली आज त्यांचा 53 वा वाढदिवस.या निमित्ताने पाहूया त्यांचा प्रवास. (Devendra Fadnavis Birthday)

Devendra Fadnavis Birthday
देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस
author img

By

Published : Jul 22, 2023, 4:03 AM IST

Updated : Jul 22, 2023, 12:22 PM IST

मुंबई: देवेंद्र यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपद भुषवणारे ते दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. २०१९ मधे सरकार स्थापन करुन सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची नोंद झाली. संघाच्या संस्कारांत त्यांची वाढ झाली आणि पुढे ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

His narrative is to the point
त्यांचे कथन मुद्देसुद असते

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.

Fadnavis takes the stand
फडणवीस रोखठोक भूमिका घेतात

फडणवीसांच्या यांना त्यांचे वडील गंगाधर राव आणि आणि काकूं शोभाताईंचा वारसा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या कष्टाने वाटचाल केली. ते अवघ्या १७ वर्षाचे होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी राजकीय वारसा संभाळला. आणि अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक झाले. पाच वर्षात कामाची चुणूक दाखवला सोबत संघाचा पाठिंबा मिळवला आणि वयाच्या २७ व्या वर्षी कमी वयाचा महापौर होण्याचा मान मिळवला.

This pair created a sensation in the state
या जोडीने राज्यात खळबळ उडवून दिली

त्यानंतर देवेंद्र यांनी आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी विधानसभेकडे मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ साली देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव केला. तेव्हा पासून त्यांचे विधानसभे सोबत पक्षातील वजन वाढवले.

There is an impulse in his speech
त्यांच्या भाषणात एक आवेग असतो

१९९९ पासून ते आजपर्यंत विधिमंडळात आमदार, अंदाज समितीचे सदस्य, नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य, नियम समितीचे सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य, सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त निवड समितीचे सदस्य, ’ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटेट फॉर एशिया रीज”चे सचिव, नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन होते.

When criticizing anyone, speak with evidence
कोणावरही टीका करताना पुराव्याने बोलतात

१९८९ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष, १९९९ पासून विधानसभा सदस्य, १९९२ ते २००१ दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा महापौर, १९९४ युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, २००१ युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, २०१० भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस, २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष २०१४ ते २०१९ मुख्यमंत्री, २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते, जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अशी पदे भुषवलेली आहेत.

They also attend Rss events
संघाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थिती लावतात

त्यांना 'कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन'तर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा वार्षिक पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे 'राजयोगी नेता पुरस्कार', पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला पहिला 'सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार', राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत 'सर्वोत्कृष्ट वक्ता' रोटरीचा 'मोस्ट चॅलेंजिंग यूथ' म्हणून विभागीय पुरस्कार, नागपूरच्या नागभूषण फाऊंडेशनतर्फे 'नागभूषण' असे मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.

Fadnavis with family
कुटुंबासोबत फडणवीस

सोबतच नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल)चे उपाध्यक्ष, संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आदी पदावर काम करताना आपली वेगळी ओळख निर्माण केली.

In campaign speeches, they tear down on the opposition
प्रचाराच्या भाषणात ते विरोधकावर तुटून पडतात

त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन सरकारच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्‍युरिटी इश्यूज‘ या विषयावर शोधनिबंध सादर केला. वॉशिंग्टन व नॅशव्हिले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे लेजिस्लेचर ऑस्ट्रेलिया, ते न्युझीलंड आणि सिंगापूरला गेलेल्या 'कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशन'च्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य होते. 'युनायटेड नेशन्स हॅबिटॅट'च्या शिष्टमंडळाचे सदस्य राहिले. चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ, ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्यूज ऑन इकॉलिजिकल ॲन्ड सोशल रिस्क‘ या विषयी सादरीकरण केले.

Plays both moderate and aggressive roles
संयमी आणि आक्रमक दोन्ही भुमिका निभावतात

डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरुण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रीजनल मीट‘मध्ये सहभाग नोंदवला. युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटॅट‘मध्ये सहभाग घेतला रशियात मॉस्को येथे भेट देणाऱ्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य राहिले. स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी ‘युनेस्को‘ डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन ॲन्ड मॅनेजमेंट इन इंडिया‘ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण होनोलुलू येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने शिवसेनेचा एक मोठा गट पक्षातून बाहेर पडला आणि तो सत्तेत सहभागी झाला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देत उपमुख्यमंत्रीपद स्विकारले. त्यानंतर अजितदादा पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी करुन घेतला. आता फडणवीसांना केंद्रात बोलावले जाईल आणि तेथे त्यांना चांगल्या खात्याचे मंत्रीपद दिले जाईल अशा चर्चा राज्यात होताना पहायला मिळतात.

Last Updated : Jul 22, 2023, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.