ETV Bharat / state

विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाला भाजपच्या दावणीला बांधत आहेत - यशवंत जाधव - Yashwant Jadhav Criticize Congress

विरोधी पक्ष नेते रवी राजा हे संभ्रमित आणि सैरभैर झाले आहेत. त्यामुळेच ते सत्ताधारी शिवसेनेवर बेछूट आरोप करीत आहेत. भाजपचे कमळ चिखलात रुतलय, त्याला काँग्रेस हात देत आहे, असे वाटत असल्याचा प्रत्यारोप करत विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाला भाजपच्या दावणीला बांधत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले.

Bmc
बृहन्मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jan 7, 2021, 8:56 PM IST

मुंबई - पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका व राज्यातील मंत्री अस्लम शेख यांच्या बहीण कमरजहा सिद्दीकी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस देण्यात आली आहे. हे षडयंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. यावर विरोधी पक्ष नेते रवी राजा हे संभ्रमित आणि सैरभैर झाले आहेत. त्यामुळेच ते सत्ताधारी शिवसेनेवर बेछूट आरोप करीत आहेत. भाजपचे कमळ चिखलात रुतलय, त्याला काँग्रेस हात देत आहे, असे वाटत असल्याचा प्रत्यारोप करत विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाला भाजपच्या दावणीला बांधत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले.

माहिती देताना विरोधी पक्ष नेते रवी राजा आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव

हेही वाचा - खुशखबर! 11 जानेवारीपासून फास्टटॅगमध्ये 5 टक्के कॅशबॅक

काँग्रेसचा आरोप

काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहा सिद्दीकी यांना सलग तीन महिने पालिका सभांना गैरहजर राहिल्याने, तुमचे नगरसेवक पद रद्द होईल, अशी नोटीस पालिकेच्या चिटणीस विभागाने पाठविली आहे. वास्तविक पाहता १८ नोव्हेंबर रोजी सिद्दीकी यांनी सुट्टीसाठी पत्र पाठवले होते. मात्र, ते पत्र डिसेंबर महिन्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर न घेता त्यांना ५ जानेवारीला ऑनलाइन सभागृहात उपस्थित न राहिल्यास, तुमचे पद रद्द करू, अशी नोटीस चिटणीस विभागाने पाठवली. चिटणीस या स्थायी समितीच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी आमच्या नगरसेविकेचे पद रद्द करण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला. या विरोधात पालिका आयुक्तांना पत्र देऊन चिटणीसांना निलंबित करण्याची मागणी केल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

काँग्रेस भाजपच्या दावणीला

विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्या स्थायी समितीच्या माध्यमातून षडयंत्र रचले जात असल्याच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना, गेल्या दहा दिवसापासून विरोधी पक्षनेत रवी राजा हे शिवसेनेवर आरोप करीत आहेत. त्यांचे हे वर्तन काँग्रेसला भाजपच्या दावणीला बांधणार असून कमळाच्या चिखलात हात घालणारे आहे. प्रशासनाने स्थायी समितीत आणलेले कोरोना संबंधीचे सर्व प्रस्ताव मंजूर केले आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत कोणताही प्रस्ताव आम्ही अडवला नाही. बहुमताने ते मंजूर झाले आहेत. भाजपने हे प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी केली. या मागणीला काँग्रेसने साथ दिली. हा सर्व प्रकार पाहता, काँग्रेस हे भाजपच्या वळचणीला जात असल्याचे दिसून येते. मात्र, विकासाची कामे होत असताना कोणीही त्याच्या आड येऊ नये, असे यशवंत जाधव म्हणाले.

आडमुठेपणाची भूमिका

कोरोना अजूनही संपलेला नाही. मात्र, कोरोनाच्या काळात काही आर्थिक गैरव्यवहार झाले असल्यास त्याबाबत लेखा परिक्षकामार्फत चौकशी बसवली आहे. त्यात काही गैरव्यवहार असल्यास ते उघड होतील. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निधी हवा असताना तो न देणे, ही आडमुठेपणाची भूमिका आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्ष नेत्यांचे अज्ञान

महापालिकेच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे भरणाऱ्या महापालिका सभांना गैर हजर राहणाऱ्या सात नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याची सूचना पालिका चिटणीस खात्याने बजावली. त्यावरून चिटणीसांना काँग्रेसकडून लक्ष केले जात आहे. हा प्रकार विरोधासाठी विरोध असल्याचा ठपका स्थायी समिती अध्यक्षांनी काँग्रेसवर ठेवला. विरोधीपक्ष नेत्यांनी याप्रकरणी मनपा आयुक्तांना पत्र दिले आहे. मुळात, चिटणीस खाते स्थायी समिती अंतर्गत येत असल्याने ते पत्र या समितीचे अध्यक्ष म्हणून मला देणे अपेक्षित होते. मात्र, ते आयुक्तांना दिल्याने यातून विरोधी पक्ष नेत्यांचे अज्ञान दिसून येते, असेही जाधव म्हणाले.

दोषी आढळल्यास कारवाई

नगरसेवकांना जाणीवपूर्वक संबंधित खात्याने पत्र पाठवलेले नाही. सभेला गैरहजर राहिल्यास तीन महिन्यानंतर पद रद्द होते, याची जाणीव करून देण्यासाठी पत्र दिले होते. शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या दोन आणि भाजपच्या तीन नगरसेवकांना पत्रे दिली आहेत. तरीही विरोधीपक्ष नेत्यांचा नगरसेवक पद रद्द करण्यासाठी पत्र दिल्याचा आरोप असेल, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जाधव म्हणाले.

हेही वाचा - लटकणाऱ्या वायरी काढून 15 दिवसांत मुंबई सुंदर करणार - आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.